कोल्हापूर, 02 ऑक्टोंबर : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत गेल्या सत्रात झालेल्या परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा निकाल तांत्रिक अडचणींमुळे पेपरला बसून सुद्धा नापास किंवा अनुपस्थित असा लागला होता. त्यामुळे विद्यार्थी वर्गात प्रचंड असंतोष पसरलेला होता. याबाबत स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्यावतीने 21 सप्टेंबर रोजी सौरभ शेट्टी यांच्यासह विद्यार्थ्यांनी प्रभारी कुलगुरू डॉ प्रमोद पाटील व परीक्षा नियंत्रकांना निवेदन दिले होते. त्यानंतर 36 हजार विद्यार्थांचे निकाल बदलून ते पास झाले आहेत.
उन्हाळी सत्रात विद्यापीठांतर्गत झालेल्या अनेक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा निकाल तांत्रिक अडचणीमुळे पेपरला बसूनही नापास अथवा अनुपस्थित असा लागला होता याबाबत विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाची भावना होती. सौरभ शेट्टी यांनी विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉक्टर पाटील यांना निवेदन दिले होते त्याला शनिवारी यश आले याचा विविध शाखांतर्गत परीक्षा दिलेल्या 36 हजार विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. यावेळेस सुनील दळवी विश्वंभर भोपळे ऋषिकेश गायकवाड शिवराज रेणुसे उपस्थित होते.
हे ही वाचा : आयटी क्षेत्रातील हे जबरदस्त कोर्सेस कराच; महिन्याला मिळेल लाखोंमध्ये सॅलरी
विद्यापीठात सिनेटच्या निवडणुकांचे बिगुल वाजले
शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रभारी कुलसचिवांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या 14 नोव्हेंबरसाठी मतदान पार पडणार आहे तर 16 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल. विद्यमान अधिसभेची मुदत केव्हाच संपली आहे. ही मुदत संपून जवळपास एक महिन्यंचा काळ उलटवा आहे. त्यामुळे अधिसभा निवडणूक जाहीर करावी अशी मागणी होत होती. अखेर विद्यापीठाने अधिसभेसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. जाणून घ्या कसा असेल अधिसभा कार्यक्रम.
हे ही वाचा : Job Alert! ‘या’ बँकेत 346 पदांसाठी मोठी भरती; असा करा नोकरीसाठी अर्ज
यांना मतदान करण्याचा अधिकार
प्रभारी कुलसचिवांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाचा अधिकार काही निवडक आणि अधिकृतच मंडळींना प्राप्त होणार आहेत. कोण आहेत अशा व्यक्त?
विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या कालावधीमध्ये निवडणुकीसाी नोंदणी करण्यात आलेले पदवीधर (विद्यापीठातील अधिविभाग आणि विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालये आदींमधून पदवी घेतलेले पदवीधर)
प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक, या निवडणुकीत निवडणूक लढवू शकतात, मतदान करु शकतात