कोल्हापूर, 21 डिसेंबर : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त बनला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून त्यावर वाद सुरू आहे. या गाण्यातील अश्लिलता आणि बिकनीच्या रंगावर विरोधकांचा आक्षेप आहे. त्याचबरोबर अनेक चित्रपट कलाकार देखील या प्रकरणात आपलं मत व्यक्त करत आहेत. फिटनेस मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना या विषयावर मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एका वादग्रस्त प्रकरणाचा अप्रत्यक्ष संदर्भही दिला. ‘त्यांना’ ठरवू द्या मिलिंद सोमणला कोल्हापूर दौऱ्यात पठाण चित्रपटाच्या वादावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कोणत्याही गोष्टीबद्दल कोर्टाला ठरवू द्या. आपण त्या गोष्टीकडं लक्ष देऊ नये, असं मत मिलिंदनं व्यक्त केलं. मिलिंद सोमण ग्रीन राईड या उपक्रमा अंतर्गत दरवर्षी 1000 किलो मीटर सायकल रॅली करतो. या उपक्रमाच्या निमित्तानेच तो कोल्हापुरात आला होता. आपण असल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. माझ्या स्वतः बद्दलही कोणी काही बोलत असेल तर मी नाहीच लक्ष देत. आपल्या देशात न्याय देण्यासाठी कायदा आहे. आपण कधीच कायदा तोडू नये. आजूबाजूचे लोक बोलतच राहतील. कोणी बोलेल की, ही गोष्ट चांगली आहे, तर कोणी म्हणेल की, ही गोष्ट चुकीची आहे. मग आपण कुणाचं ऐकायचं हा प्रश्न पडतो? आपण कुणाचं ऐकायचं ते ठरवणारी ही मंडळी कोण? असा सवालही त्यानं उपस्थित केला. आपण कायदा तोडायचा नाही, कोणतीही बेकायदेशीर कृती करायची नाही, असं मिलिंदनं यावेळी सांगितलं. Pathaan वादावर शाहरूख खानची तीव्र प्रतिक्रिया; म्हणाला, सोशल मीडिया… जुनी आठवण… पठाण वादावरुन मिलिंद सोमणला त्याच्यावर यापूर्वी झालेल्या आरोपांची आठवण झाली. ‘सर्व गोष्टी नंतर सुरळीत होतात. माझ्यावरील आरोपातून बाहर पडण्यााठी मला 14 वर्ष प्रदीर्घ लढा द्यावा लागला. 14 वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर निर्दोष मुक्तता झाल्याची आठवण मिलिंदने करून दिले. सर्व काही कोर्ट ठरवतं. 14 वर्ष केस चालल्यानंतर मला निर्दोष ठरवण्यात आलं,’ असं तो म्हणाला. Besharam Rang Controversy: कोणी घालायला लावली दीपिकाला भगव्या रंगाची बिकिनी? पठाण सिनेमाचा वाद काय? शाहरुख खानच्या “पठाण” बहुचर्चित चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून हा वाद निर्माण झाला आहे. समाजात अश्लीलता पसरवल्याबद्दल या गाण्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. तर दीपिकाने या गाण्यात परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन देखील लोक या गाण्यावर टीका करत आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा असून 2023 मधील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटातून चार वर्षांच्या कालावधीनंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहण्यास चाहते कमालीचे उत्सुक आहेत. दरम्यान, या वादांच्या पार्श्वभूमीवरसिनेमाला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.