JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर 'लव्ह जिहाद' प्रकरण, 17 दिवसांनंतर ती मुलगी मुलासोबत सापडली!

कोल्हापूर 'लव्ह जिहाद' प्रकरण, 17 दिवसांनंतर ती मुलगी मुलासोबत सापडली!

कोल्हापूर लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांना अखेर यश आलं आहे. बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी मुस्लिम युवकासह सापडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 2 नोव्हेंबर : कोल्हापूर लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांना अखेर यश आलं आहे. बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी मुस्लिम युवकासह सापडली आहे. कर्नाटकच्या संकेश्वरमध्ये हे दोघंही सापडले आहेत. या दोघांनाही संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलं, यानंतर आता कोल्हापूर पोलीस कर्नाटकात रवाना झाले आहेत. नितेश राणे यांनी सकाळीच कोल्हापूरमध्ये या मुद्द्यावरून आंदोलन केलं होतं. आंदोलनानंतर कोल्हापूर पोलिसांनी मुलीचे अपरहण करणाऱ्या संशयिताचा फोटो जाहीर केला होता. अल्ताफ काझी या 22 वर्षीय संशयीताचा फोटो कोल्हापूर पोलिसांनी प्रसिद्ध करत, अपरहणकर्ता दिसल्यास ताबडतोब संपर्क करण्याचं आवाहन केलं होतं. काय आहे प्रकरण? कोल्हापूरची ही अल्पवयीन मुलगी 17 ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. इयत्ता नववीत असणारी ही मुलगी दिवाळीपूर्वीचा पेपर द्यायला गेली होती, पण परत घरीच आली नाही. यानंतर मुलीच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मुलीसोबत मुस्लिम युवकही गायब झाल्यामुळे संशय बळावला आणि याला लव्ह जिहादचं वळण मिळालं. या प्रकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू होती, पण पोलिसांकडून तपासाला गती येत नसल्यामुळे बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात भाजप आमदार नितेश राणेही सहभागी झाले होते. मुलगी परत आली नाही तर तांडव करू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता. तसंच पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करत त्यांनी कारवाईची मागणीही केली. धर्मांतर बंदीचा कायदा येत्या अधिवेशनात आणणार असल्याचंही नितेश राणे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या