JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Crime : तांदूळ, कुंकू आणि नोटा, वाड्यात सुरू होता भयंकर प्रकार, शाहूंच्या कोल्हापुरातली धक्कादायक घटना

Kolhapur Crime : तांदूळ, कुंकू आणि नोटा, वाड्यात सुरू होता भयंकर प्रकार, शाहूंच्या कोल्हापुरातली धक्कादायक घटना

कोल्हापुरात गुप्तधनातून कोट्यवधी रुपये मिळवून देण्याच्या अमिषाने एका महिलेला लाखो रुपयांना फसवल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 18 ऑक्टोबर : कोल्हापुरात जादुटोना, फसवणुकीच्या गुन्हात वाढ होताना दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी एका मांत्रीकाकडून महिलेचा खून केल्याच्या आरोपाची घटना घडली होती. दरम्यान ही घटना ताजी असतानाच दुसरी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुप्तधनातून कोट्यवधी रुपये मिळवून देण्याच्या अमिषाने एका महिलेला लाखो रुपयांना फसवल्याची घटना समोर आली आहे. गुप्तधनाचा तगादा लावल्यानं मंत्रिकानं यापूर्वी महिलेची हत्या केली होती. अंनिसच्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घरात खड्डा खोदून बकऱ्याचा बळी द्यायला लावल्याचाही आरोप त्या मांत्रीकावर  करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधून गुप्तधनातून कोट्यवधी रुपये मिळवून देण्याच्या आमिषानं मांत्रिकांच्या टोळक्यानं एका महिलेची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचे घटना समोर आली आहे. मंत्रिकांनी वेळोवेळी मंत्रतंत्र करत महिलेकडून साडेचार लाख रुपये उकळले आहेत. या प्रकरणी 11 जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :  कोल्हापुरात हत्येचं सत्र सुरूच, महिलेचा निर्जनस्थळी खून, कारण अद्यापही अस्पष्ट

संबंधित बातम्या

गुप्तधनाचा तगादा लावल्यानं मंत्रिकानं यापूर्वी महिलेची हत्या केली होती. अंनिसच्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घरात खड्डा खोदून बकऱ्याचा बळी द्यायला लावल्याचाही आरोप त्या मांत्रीकावर  करण्यात आला आहे.

महिलेचा खून केल्याचा मांत्रीकावर आरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा- शिरोली दुमाला मार्गावर असलेल्या पाडळी खुर्द गावातील एका शेतात महिलेला मारण्यात आले आहे. धारदार शस्त्राने डोक्यात वार करून महिलेचा खून केल्याची काल (दि.30) शुक्रवारी घडली. आरती अनंत सामंत (वय 45, रा. पंचगंगा हॉस्पिटलजवळ, शुक्रवार पेठ) असे या महिलेचे नाव आहे.

जाहिरात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशीरा करवीर पोलिसांकडून तपास सुरू होता या दरम्यान  शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील एका मांत्रिकासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. खुनाच्या नेमक्या कारणांसह हल्लेखोरांची नावेही लवकरच निष्पन्न होतील, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा : धक्कादायक! विदर्भ, मराठवाडा नाही कोल्हापुरात शेती परवडत नसल्याने तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

जाहिरात

हल्लेखोरांसह खुनाचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. आर्थिक वाद, गुप्तधन अथवा अन्य कारणातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. खुनानंतर साडेचार लाखांचे 9 तोळे दागिनेही हल्लेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या