JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Car Accident : रस्त्यावर किडेच किडे, बाईक स्लिप झाली आणि कारच्या चाकाखालीच आला तरुण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

Kolhapur Car Accident : रस्त्यावर किडेच किडे, बाईक स्लिप झाली आणि कारच्या चाकाखालीच आला तरुण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

कोल्हापूरातील शिरोली येथे अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. उजेडाला आकर्षित होणाऱ्या किड्यांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल 20 ते 25 गाड्या स्लिप झाल्याचा प्रकार घडला

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 23 ऑक्टोबर : मागच्या काही दिवसांपासूस परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान या पावसामुळे रात्रीच्या वेळी किड्यांचा थवा येत असतो.  हे किडे फक्त नदीच्या किनाऱ्यावर येत असतात यामुळे नदीच्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा त्रास होत असतो. याचाच फटका कोल्हापुरातील वाहनधारकांना बसला आहे. काल(दि.22) रात्रीच्या सुमारास कोल्हापुरातील शिरोली येथे वाहनांच्या उजेडाला आकर्षित होणाऱ्या किड्यामुळे 20 ते 25 वाहने एकमेकांना आदळली. यातील एका व्यक्तीची गाडी कारच्या समोर स्लिप झाल्याने चाकाखाली गेल्याने जवळपास 10 फूट फरफटत गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कोल्हापूरातील शिरोली येथे अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. उजेडाला आकर्षित होणाऱ्या किड्यांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल 20 ते 25 गाड्या स्लिप झाल्याचा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीची गाडी कारच्या समोरच स्लिप झाल्याने तो चाकाखाली जवळपास 10 फुटांपर्यंत फरफटत गेला.मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून तो त्यातून बचावला. विशेष म्हणजे त्याला यामध्ये कोणतीही गंभीर इजा झाली नाही. पंचगंगा नदीवरील पुलावर शिरोली येथे हा प्रकार घडला.

जाहिरात

हे ही वाचा :  अरं बाई मेली मेली, भलामोठा गवा बेभान झाला अन् समोर आली महिला, कोल्हापूरमधला थरारक VIDEO

नेमक काय घडलं?

कोल्हापूर आणि शिरोलीला जोडणारा एक पूल आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्गावर असल्याने वाहनांची मोठी रहदारी असते. या भागात गांधीनगर कापडाची मोठी बाजारपेठ असल्याने दिवाळीनिमीत्त मोठी गर्दी झाली होती. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसात काही किडे येत असतात हे किडे फक्त नदी किनाऱ्यावर असतात. हे किडे उजेडाकडे आकर्षीत होत असल्याने नदीच्या पुलावरील वाहनांकडे येतात.

जाहिरात

यामुळे कोल्हापुरच्या शिरोली पुलावर प्रचंड प्रमाणात हे किडे आल्याने वाहन धारकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान वाहन धारकांना अचानक आलेल्या समस्येमुळे गोंधळून वाहने घसल्याने जवळपास 20 ते 25 वाहने एकमेकांना आदळ्याची घटना घडली होती. याचबरोबर एका व्यक्तीची गाडी कारच्या समोरच स्लिप झाल्याने तो चाकाखाली जवळपास 10 फुटांपर्यंत फरफटत गेला.मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून तो त्यातून बचावला. विशेष म्हणजे त्याला यामध्ये कोणतीही गंभीर इजा झाली नाही.

जाहिरात

हे ही वाचा :  Dhanteras 2022 : सोन्याचे भाव झाले कमी, खरेदीसाठी करवीर नगरीत झुंबड, Video

पंचगंगा नदीवरील पुलावर शिरोली येथे हा प्रकार घडला. यामुळे नागरिकांची मोठी कुचंबना झाली होती. या घटनेनंतर काही नागरिकांनी सतर्कता बाळगून वाहने सावकाश चालवत होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या