JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Crime : धक्कादायक! कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, रुग्णालयात गेल्यानंतर भयानक वास्तव समोर

Kolhapur Crime : धक्कादायक! कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, रुग्णालयात गेल्यानंतर भयानक वास्तव समोर

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या उत्रे गावामध्ये सचिन अरुण पाटील (वय 33) याने चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 18 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथे मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या उत्रे गावामध्ये सचिन अरुण पाटील (वय 33) याने चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Kolhapur Crime) दरम्यान या घटनेने पन्हाळा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. वारंवार अशा घटनामध्ये वाढ होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान पीडित मुलीच्या आईने पन्हाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सचिन पाटील याच्याविरुद्ध बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करून याला अटक करण्यात आली आहे. संशयित पाटील याचे कोतोली येथे हॉटेल आहे. तो व पीडित मुलगी एकाच गावचे रहिवासी आहेत. संशयिताची पीडित मुलीच्या घरी येत होती. याचा गैरफायदा घेऊन संशयित पाटील याने पीडित मुलीशी जानेवारी ते मार्च 2022 या काळात वेळोवेळी संबंध ठेवल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे.

हे ही वाचा :  औरंगाबादेत अपहरण नाट्याचा थरार, 4 कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचं सिनेस्टाईल अपहरण

संबंधित बातम्या

पीडितेच्या पोटात वेदना होऊ लागल्याने उपचारासाठी कोल्हापूर येथे नेले असता डॉक्टरांनी ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. यानंतर तिच्या आईसह नातेवाईकांनी पन्हाळा पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. पीडितेने जबाबात सचिन पाटील याने वेळोवेळी संबंध ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान या घटनेमुळे पन्हाळा तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच पोलिसांनी याबाबत कठोर पाऊले उचलून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जाहिरात

मागच्या दोन आठवड्यात दोन घटनांनी कोल्हापूर जिल्हा चर्चेत

कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथे एक धक्कादाय घटना समोर आली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलीशी लग्न करत गरोदर केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान तिचे अवघ्या साडेबाराव्या वर्षात लग्न झाल्याचेही उघड झाले आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांनी घालून दिलेल्या शिकवणींना गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो कॅन्सर; या लोकांना जास्त धोका

याबाबत ग्रामसेवकांनी पोलिसांना जबाब दिला आहे. ते म्हणाले कि, माझे दऱ्याचे वडगाव व वडवाडी गावात शासनाकडून वेळोवेळी आदेशाचे पालन करून शासनाकडून येणाऱ्या योजना राबविल्या जातात. तसेच मी  दऱ्याचे वडगाव व वडवाडी गावात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम पाहत आहे. दरम्यान तपासणी दरम्यान मला एका अल्पवयीन मुलीवर संशय आल्याने मी तिला प्राथमीक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी लावून दिले यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या