JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Raju Shetti : राजू शेट्टींच्या मुलाला पोलिसांकडून ताब्यात, शिक्षण संस्थेसमोर आंदोलनाचा परिणाम

Raju Shetti : राजू शेट्टींच्या मुलाला पोलिसांकडून ताब्यात, शिक्षण संस्थेसमोर आंदोलनाचा परिणाम

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विद्यार्थी परिषदेच्यावतीने मागच्या दोन दिवसांपासून करण्यात येत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 24 नोव्हेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील डिकेटीई ही शिक्षण संस्था ऑटोनोमस असल्याने या संस्थेअंतर्गत होणाऱ्या सर्व परिक्षा महाविद्यालय अंतर्गत घेतल्या जातात. दरम्यान ही संस्था ऑटोनोमस असल्याने जे विद्यार्थी नापास  होतात त्यांना वर्षातून तीन वेळा परिक्षा देण्याची परवानगी असते. परंतु डिकेटीई ही एकमेव संस्था तीन वेळा परिक्षा न घेत असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी नापास व इयर डाऊन होत आहेत. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विद्यार्थी परिषदेच्यावतीने मागच्या दोन दिवसांपासून करण्यात येत आहे.

दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये काही निष्पण्ण झाल्याने स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे युवक डीकेटीई या संस्थेच्या दारात आदोलनासाठी बसले होते. दरम्यान आज संध्याकाळी 6 च्या दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरभ शेट्टी यांना गाव भाग पोलिसांनी अटक केले आहे.

हे ही वाचा :  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा डिवचलं, आता तर थेट फडणवीसांचं नावच घेतलं!

संबंधित बातम्या

कालपासून डीकेटीई कॉलेजसमोर विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू होते. या कारणावरून पोलिसांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थांना ताब्यात घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदा घोषणाबाजी केली. दरम्यान काल महाविद्यालय आणि स्वाभिमानी विद्यार्थी परिषद यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या सौरभ शेट्टी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली होती.

स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह सौरभ शेट्टी यांनी आंदोलन केले होते. यावेळी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्याची बाजू समजावून घेत. ही बाब शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने स्वायत्त शिक्षण संस्थांचा संबंध थेट युजीसीसोबत असल्याने यासंदर्भात माहिती घेऊन डीकेटीई महाविद्यालयास पत्र पाठवण्याची आश्वासन दिले होते.

जाहिरात

हे ही वाचा :   ‘कर्नाटक, महाराष्ट्र वादाला काँग्रेसच जबाबदार’, केशव उपाध्येंकडून एस.एम. जोशींच्या ‘त्या’ पुस्तकाचा दाखल  

तसेच परीक्षेसंदर्भात सर्वस्वी निर्णय त्या स्वायत्त महाविद्यालयाचा असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले होते. त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सौरभ शेट्टी यांनी घेतला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या