JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Egg Dosa : डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली कोल्हापुरी डिश, 18 वर्षांपासून सुपरहिट! Video

Egg Dosa : डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली कोल्हापुरी डिश, 18 वर्षांपासून सुपरहिट! Video

Egg Dosa : दाक्षिणात्य पदार्थांना नॉनव्हेजचा तडका दिलेली एक खास डिश कोल्हापुरात गेली 18 वर्ष सुपरहिट आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 1 फेब्रुवारी : दाक्षिणात्य पदार्थांना नॉनव्हेजचा तडका दिलेला सध्या बऱ्याच ठिकाणी ऐकायला किंवा पाहायला मिळतो. कोल्हापूरमध्येही याच प्रकारची एक डिश गेल्या 18 वर्षांपासून मिळते. अंडा डोसा असं या पदार्थाचं नाव आहे.  डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली ही डिश कोल्हापूरकर मोठ्या आवडीनं खातात. बेस्ट अंडा डोसा कोल्हापूरच्या शास्त्री नगर रोडवर बेस्ट अंडा डोसा अशी दस्तगीर इलाई भालदार यांची अंडा डोसाचा गाडा आहे. त्यांनी 2005 साली ऐतिहासिक बिंदू चौकात अंडा डोसा विकण्यास सुरूवात केली. त्यानंतर 2009 पासून आजपर्यंत त्यांचा शास्त्रीनगरच्या चौकात गाडा आहे. या व्यवसायात त्यांनी पत्नी आणि मुलगाही मदत करतात.  येथील अंडा डोसा खाण्यासाठी  सकाळी 8.30 पासूनच गर्दी सुरू होते दुपारी 2.30 पर्यंत हा गाडा सुरू असतो. ‘मी सुरूवातीला कुकर, मिक्सर रिपेअर करण्याचं काम करत होतो. त्यानंतर फक्त साधा डोसा विकायला सुरूवात केली. त्यावेळी काहीतरी नवा पदार्थ बनवण्याचा विचार मी केला. त्यामधूनच या डिशची कल्पना सुचली,’ असं दस्तगीर भालदार यांनी सांगितलं. चिकन आणि वडापावच्या हिट कॉम्बिनेशननं कोल्हापूरला लावलं वेड, पाहा Photos कसा बनवतात अंडा डोसा ? सध्या डोश्याला अंड्याचे ऑम्लेटचा टच देऊन हा अंडा डोसा बनवला जातो. सुरुवातीला तव्यावर साधा डोसा तयार करून घेतला जातो. त्यावर मेतकुट, कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी, घरीच बनवलेली शेजवान चटणी टाकली जाते. यावरच अंडे फोडले जाते. मग ते व्यवस्थित एकत्र करून डोश्यावर सगळीकडे पसरवले जाते. अशा प्रकारे हा अंडा डोसा तयार होतो.

कोणकोणते प्रकार मिळतात? भालदार यांच्याकडे प्लेन अंडा डोसा त्याचबरोबर अंडा उत्तापा, स्प्रिंग अंडा डोसा, स्प्रिंग हैद्राबादी डोसा, हैद्राबादी डोसा, चीज अंडा डोसा, चीज अंडा उत्तापा, चीज स्प्रिंग अंडा डोसा, चीज स्प्रिंग डोसा, डब्बल अंडा डोसा, ट्रिपल अंडा डोसा इ. पदार्थ मिळतात. तर 5 अंडी, 8 अंडी, 10 अंडी आणि 20 अंडी असणारे डोसे देखील ते बनवून देतात. दस्तगीर भालदार हे गेली 18 वर्षे अंडा डोसा विकत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वस्ताई ते महागाई हा प्रवास अंडा डोश्याच्या माध्यमातून देखील पहिला आहे. ते सुरूवातील 6 रुपयांना साधा डोसा आणि 10 रुपयाला अंडा डोसा विकत असत. आता साधा डोसा घेण्यासाठी 35 तर सिंगल अंडा डोसासाठी 45 रुपये ग्राहकांना मोजावे लागतात. एकाच ठिकाणी मिळतात अंड्यापासून बनवलेले तब्बल 70 पदार्थ! पाहा Video एखाद्या अनोख्या डिशची चव चाखायला कोल्हापूरकर नेहमीच उत्सुक असतात. पण, गेली 18 वर्षे हा कोल्हापूरकरांच्या जिभेला पसंत पडलेला अंडा डोसा आजही एक नवीन डिश असल्याप्रमाणेच विकला जातोय. कुठं खाणार अंडा डोसा? शास्त्रीनगर चौक, शास्त्रीनगर चौक, यादव नगर मेन रोड, कोल्हापूर, 416008 संपर्क : +91 8796431515

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या