ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर 05 सप्टेंबर : अगदी सर्दी-ताप आला तरी आपण सर्वात आधी डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतो. अगदी किरकोळ त्रासापासून ते एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यापर्यंत डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. हे डॉक्टर अनेकांनी जणू नवं आयुष्यच देत असतात. अशीच एक घटना सध्या कोल्हापुरमधून समोर आली आहे. ज्यात डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे.
VIDEO| खिडकीतून जीव वाचवण्यासाठी धडपड, लखनऊच्या हॉटेलमध्ये भीषण आग कोल्हापूरमधील एका घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही यामध्ये दिसणाऱ्या डॉक्टरचं कौतुक कराल. व्हिडिओमध्ये दिसतं, की डॉक्टरांसमोर एक रुग्ण बसलेला आहे. इतक्यात खुर्चीवरच अचानक त्याला हार्ट अटॅक आला. मात्र, डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने रुग्णाचे प्राण वाचले.
कोल्हापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अर्जुन अडनाईक यांच्या रुग्णालयात हा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रुग्ण आणि नातेवाईक डॉक्टरांशी चर्चा करत असतानाच अचानक रुग्णाला अस्वस्थ वाटू लागलं. रुग्ण खुर्चीतच अस्वस्थ झाला. यावेळी प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी रुग्णाच्या छातीवर हाताने हलके ठोके देत रुग्णाचा जीव वाचवला. 9 मिनिटांत 20 KM अंतर केलं पार; सीटबेल्टही नाही, ‘ही’ ठरली सायरस मिस्त्रींच्या अपघाताची कारणं? व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक डॉक्टरसमोरच बसलेले असून ते डॉक्टरांसोबत चर्चा करत आहेत. रुग्णही खुर्चीवर बसलेला आहे. इतक्यात रुग्णाला प्रचंड अवस्वस्थ वाटू लागतं. हे पाहताच डॉक्टर क्षणाचाही विलंब न करता रुग्णाजवळ जातात आणि त्याला मृत्यूच्या दारातून परत आणतात. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी डॉक्टरांचं कौतुक केलं आहे.