कोल्हापूर, 26 मे : कोल्हापुरात (Kolhapur) शाहू कृतज्ञतापर्व अंतर्गत फुटबॉल चषक स्पर्धेत राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या राड्याचे व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे हा राडा निवळण्यासाठी खुद्द छत्रपती मालोजीराजे (Chhatrapati Malojiraje) यांना मध्यस्ती करावी लागली. यावेळी खेळाडू, प्रशिक्षक आणि पोलीस यांच्यातही बाचाबाची झाली. पोलिसांनी राडा निवळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहीजण पोलिसांवरही चालून जाण्याच्या तयारीत होते. संबंधित घटनेमुळे पीटीएम आणि शिवाजी मंडळ यांच्या सामन्याला गालबोट लागले आहे. नेमकं काय घडलं? कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांचं कृतज्ञतापर्व अंतर्गत फुटबॉल चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत अंतिम सामन्यादरम्यान खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात मोठा वाद उफाळला. खेळाडू आणि प्रशिक्षक मैदानावर थेट एकमेकांना भिडले. दोघांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. ही बाचाबाची मारहाणीवर येऊन ठेपली.
( ‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, शिवसेनेचे संयमी नेते एकनाथ शिंदे भडकले ) या दरम्यान प्रसंगावधान साधून पोलिसांनी मध्यस्थी केली. वाद तरीही वाढत होता. त्यामुळे अखेर छत्रपती मालोजीराजे यांना मध्यस्ती करत वाद मिटवावा लागला.