JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनानंतर कोल्हापुरात का वाढली क्षयरुग्णांची संख्या? पाहा Video

कोरोनानंतर कोल्हापुरात का वाढली क्षयरुग्णांची संख्या? पाहा Video

कोरोना व्हायरसमुळे असलेले निर्बंध उठवण्यात आल्यानंतर कोल्हापूरात क्षयरुग्णांची संख्या वाढली आहे. याचे कारण तुम्हाला माहिती आहे का?

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 10 नोव्हेंबर : कोरोना काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. दळणवळण बंद होते. अनेकांना याचा मोठा फटका बसला. पण, त्याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्षयरुग्णांच्या बाबतीत एक दिलासादायक गोष्ट घडली होती. या काळात या रुग्णांची संख्या कमी झाली होती. आता कोरोचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्याचवेळी याचा परिणाम म्हणून क्षयरुग्णांची संख्या वाढली आहे. काय आहे कारण? क्षयरुग्णांच्या (टीबी) जिल्हयातील आकडेवारीवर नजर टाकल्यास नेमके हेच झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात क्षयरुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली होती. मास्कसह सोशल डिस्टन्सिंग पथ्यावर पडले होते. मात्र, कोरोना हटला आणि वर्षभरात क्षयरुग्णांची संख्या पूर्वपदावर गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसतानाच्या काळात म्हणजे 2019 च्या  तुलनेत 2020 साली  रुग्णसंख्या हजाराने घटली होती. गेल्यावर्षी सप्टेंबरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट राहिली होती. या वर्षातही रुग्ण कमी झाले होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबल्यानंतर लोकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केले. साहजिकच श्वसनाशी संबंधित संसर्गजन्य आजारांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा क्षयरुग्णांची संख्या ऑक्टोबर अखेरीसच गतवर्षाच्या रुग्णसंख्येपर्यंत पोचली आहे. सर्वसाधारणपणे लोकांनी शिंकताना, खोकताना काळजी घेणे आवश्यक आहे. कुठेही थुंकणे टाळले पाहिजे. यातून आजारांच्या संसर्गाची शक्यता वाढते, अशी सुचना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात क्षयरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषतः कोरोनानंतर या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे प्राथमिक चित्र असून दिसत आहे. जिल्हयात कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाउन, निर्बंधांमुळे नागरिक घरात होते. परिणामी क्षयरुग्णही या काळात घरात होते. आहे. त्यामुळे क्षयरोगाचा प्रसार काही प्रमाणात मंदावला होता. मात्र, कोरोनानंतर क्षयरोगाचा प्रसार ही वाढ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात सप्टेंबर महिन्यात घरोघरी जाऊन शोध घेण्यात आला. त्यात 222 क्षयरुग्ण सापडल्याचे डॉ. कुंभार यांनी सांगितले. पालकांनो सावधान! मुलांमध्ये वाढतंय मनोरुग्णांचे प्रमाण, अशी ‘घ्या’ काळजी video काय आहे आकडेवारी? क्षयरुग्णांची संख्या भारत (9 नोव्हेंबरपर्यंत) -  2024866 महराष्ट्र (9 नोव्हेंबरपर्यंत) -  195951 कोल्हापूर जिल्हा माहिती (2018 ते 9 नोव्हेंबर 2022) वर्ष | सरकारी हॉस्पिटल | खासगी हॉस्पिटल | एकूण 2018 | 2392 | 427 | 2819 2019 | 2483 | 554 | 3037 2020 | 1680 | 341 | 2021 2021 | 2051| 423 | 2474 2022 | 2025 | 442 | 2467 कोरोनातून बरे झालेल्यांना लवकर लागण.. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांची श्वसन क्षमता ही कमजोर झालेली असते. त्यामुळे अशा लोकांना श्वसनाचे आणि इतर आजार देखील लवकर होतात. त्यामुळे केलेल्या तपासणीअंती 2021 या वर्षात कोरोना होऊन गेलेल्या 274 जणांना क्षयरोग झाल्याचे आढळून आले आहे. तर 2022 या वर्षात 88 कोरोनावर मात केलेले रुग्ण क्षय रोगाने ग्रस्त आढळले, असे देखील डॉ. कुंभार यांनी नमूद केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या