JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / किरीट सोमय्यांच्या आरोपातून किशोरी पेडणेकरांनी पुराव्यासह काढली हवा, म्हणाल्या....

किरीट सोमय्यांच्या आरोपातून किशोरी पेडणेकरांनी पुराव्यासह काढली हवा, म्हणाल्या....

किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलेले आहे. धादांत खोटं बोलून व आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचा षडयंत्र चालू झालेले आहे

जाहिरात

किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलेले आहे. धादांत खोटं बोलून व आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचा षडयंत्र चालू झालेले आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 ऑक्टोबर : SRA घोटाळ्यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोमय्यांच्या आरोपांना पेडणेकर यांनी जशाच तसे उत्तर दिले. या प्रकरणी आधीच कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले असून माझे नाव नाही, असा पलटवार केला आङे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून एसआरए घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याला पेडणेकर यांनी जशास तसे उत्तर दिले.

संबंधित बातम्या

किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलेले आहे. धादांत खोटं बोलून व आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचा षडयंत्र चालू झालेले आहे. SRA गाळ्यांबाबत केलेल्या आरोपांचं स्वतः एसआरए या प्राधिकरणाने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. ज्यात माझा किंवा माझ्या परिवाराचा उल्लेख नाही असे कोर्टाला कळविलेले आहे, असा खुलासा पेडणेकर यांनी केला. दरम्यान, किशोरी पेडणेकर यांना पुन्हा दादर पोलिसांनी मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. खोटे काही केले नाही तर मग कुलूप घेवून दुकाने घरं, बंद करायला निघाला आहात. तर मग चौकशीला समोरे का जात नाही, असा सवाल सोमय्यांनी केला. (किशोरी पेडणेकर अडचणीत, एसआरए प्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी) पुढच्या चार दिवसात मी किशोरी पेडणेकरांच्या मुलाचे परदेशात काय उद्योग आहे. हे सांगणार आहे. हे प्रकरण खूप मोठे आहे. मोबाईलचा सीडीआर आहे. त्या का घाबरत आहेत. आणखी अशा चार एसआरएमध्ये त्यांनी घोटाळे केले आहेत, असा आरोपही सोमय्यांनी केला. मी सर्व एजन्सीजना पुरावे दिले होते. निर्मल नगर पोलीस, मुख्यमंत्री कार्यालय सगळीकडे मी पुरावे दिले होते पण त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दबाव आणला होता. सहा ठिकाणी किशोरीताईच्या विरोधात चौकशी चालू आहे. मी आता पुन्हा सतीश लोखंडे यांच्याशी बोललो त्यांनी तपास सुरू केला आहे. अर्धा डझन ठिकाणी चौकशी सुरू आहे. त्यात कंपनी मंत्रालय, मुंबई ॲाफेन्स वींकने करावी अशी माझी मागणी आहे, असंही सोमय्या म्हणाले. (‘हे टाळे लावा, पण मी बोलणारच’, SRA घोटाळ्यावरून किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल) ‘माझ्या मागणीचा ते स्वीकार करतील असा माझा विश्वास आहे. किशोरी पेडणेकर यांच्या मुलाने पुराव्यासोबत खाडाखोड केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी जी नौटंकी केली. पुढल्या वर्षीच्या दादासाहेब फाळके अवार्ड त्यांना दिला पाहिजे, असा टोलाही सोमय्यांनी लगावला. ‘संजय अंधारी याला एसआरएचा फ्लॅट मिळाला. त्याला एसआरए फ्लॅट दिला. किशोरी पेडणेकर आणि क्रीश कॅार्पोरेटने कंपनी मंत्रालयाली लिव्ह लासन्ससवर दिला. या दोन्ही सह्या वेगवेगळ्या आहेत. त्यात जमीन आसमानचे अंतर आहे. यातला खरा संजय अंधारी कोण आहे. हे खरं शोधून काढा, अशी मागणीही सोमय्यांनी केली. ‘किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नाही तर त्यांचा भाऊ सुनिल कदम आहे. हे मी नाही सांगत आहे तर या स्वत: सांगत आहे. सुनिल कदम कोविड काळात गेला आहे. या नौटंकी करत आहे. मृत भावाला अशी भाऊबीज देत आहात? मीडियाला सांगता किरिट सोमय्या तर माझा भाऊ आहे. लाज वाटली पाहिजे की, तुम्ही अशा पद्धतीने आपल्या मृत भावाच्या नावे घोळ करता, अशी टीकाही सोमय्यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या