"माझ्या हत्येचा कट, माझा घातपात होणार हे पोलिसांनीच सांगितलं" किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
दापोली, 26 मार्च : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट अनिधिकृतपणे बांधले असून ते तोडण्याची मागणी किरीट सोमय्यां **(Kirit Somaiya)**कडून होत आहे. आज सकाळी प्रतिकात्मक हातोडा घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या दापोलीत (Kirit Somaiya in Dapoli) दाखल झाले. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दापोलीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले त्यानंतर निलेश राणे आणि किरीट सोमय्या हे चार कार्यकर्त्यांसह दापोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. यानंतर किरीट सोमय्या हे पोलीस ठाण्यातून बाहेर आले आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर किरीट सोमय्या हे अनिल परब यांच्या रिसॉर्टच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. मात्र, लगेचच ते पुन्हा परतले आणि दापोली पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, “निलेश राणे यांनी आपल्याला सांगितलं आहे की किरीट सोमय्यांची हत्या.. असं कटकारस्थान दापोली पोलीस स्टेशनचे, रत्नागिरीचे एसपी आणि शिवसेनेचं झालं आहे असं दिसत आहे.” वाचा : किरीट सोमय्यांचं आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चॅलेंज, म्हणाले, हिंमत असेल तर… किरीट सोमय्या यांनी पुढे म्हटलं, आम्ही मुंबई, रायगड, रत्नागिरीतून 200 वाहनांनी कार्यकर्ते आलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की, चौघे जण तुम्ही आत या आणि आम्ही चारच जण आतमध्ये गेलो. त्यानंतर तासाभरात आमच्या गाड्या, कार्यकर्त्यांना इथून अर्धा किलोमीटर दूर पाठवलं. आता ते कुठे आहेत ते माहिती नाहीत. दापोलीच्या गल्ल्या छोट्या आहेत. आता आम्हाला सांगतात तुम्हाला चौघांना जिथे जायचं आहे तिथे जा. वाचा : मंत्र्यांना अडचणीत कोण आणतं? नितीन गडकरी म्हणतात, “बायको किंवा मेहुणा नाहीतर…” म्हणजे हा एसपी माफिया सेनेचा एक शाखाप्रमुख झालेला आहे. त्यांनी लिहून दिलं आहे मला की, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तुमचं घातपात करणार आहेत. हे मी नाही दिलंय तर रत्नागिरीच्या एसपींनी लिहून दिलं आहे की तुमचा घातपात होणार आहे म्हणून तुम्ही चारपेक्षा जास्त नकोत. हे काय पोलीस आहेत का? असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला. आम्हाला रिसॉर्टवर जाऊन दिलं जात नाहीये आणि आमच्या कार्यकर्त्यांनाही इथे येऊ दिलं जात नाहीये. आम्हाला रिसॉर्टवर जायचं आहे आणि आम्ही सर्वजण जाणार असंही किरीट सोमय्या म्हणाले.