ठाणे, 16 जानेवारी: ठाणे (Thane) जिल्ह्यातील उल्हासनगर (Ulhasnagar) परिसरात दोन महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण (Minor girl kidnap) करण्यात आलं होतं. परिसरातील एका सराईत गुन्हेगारानेच पीडित मुलीचं अपहरण करून फरार झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीच्या मागावर होते. पण आरोपीनं आपला मोबाइल क्रमांक बंद ठेवल्यानं त्याचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान त्याने केलेली एक चूक त्याला चांगलीच महागात पडली आहे. आरोपीचा सुगावा लागताच पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या (accused arrested from gujrat) आहेत. तसेच पीडित मुलीची सुटका करून तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संतोष बाबू अण्णा उर्फ अंडापाव असं अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. त्याने दोन महिन्यांपूर्वी उल्हासनगर परिसरातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. तेव्हापासून नराधम आरोपी फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी आरोपीला गुजरातमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी गुजरातला कशी पोहोचली? उल्हासनगरात मानवी तस्करीचं रॅकेट सक्रीय आहे का? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. हेही वाचा- साताऱ्यात अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य, ब्लॅकमेल करत सुरू होता धक्कादायक प्रकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचं अपहरण झाल्यापासून पोलीस आरोपी संतोषचा शोध घेत होते. पण त्याने मोबाइल फोन ठेवल्याने त्याचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या मित्रांच्या फोन कॉल्सवर लक्ष ठेवून होते. दरम्यान त्यांना गुजरातमधून कॉल्स येत असल्याचा सुगावा लागला. गुजरातमधून आपल्या मित्रांना कॉल करणं आरोपीला चांगलंच महागात पडलं आहे. याच चुकीमुळे आरोपी गजाआड झाला आहे. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुजरात गाठत अपहरण झालेल्या मुलीची सुटका केली आहे. तसेच आरोपीला अटक केली. दोघांनाही उल्हासनगर याठिकाणी आणण्यात आलं आहे. हेही वाचा- टोळक्यानं अपहरण करत 4 दिवस ठेवलं डांबून अन्..; पुण्याला हादरवणारी घटना कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं आहे. तर आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. आरोपी संतोष बाबू अण्णा उर्फ अंडापाव हा उल्हासनगरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात दंगली, खुनाचे प्रयत्न आणि मारहाण यासारखे गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.