सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सावंतवाडी खरेदी विक्री संघाची निवडणूक आज होत आहे.
भरत केसरकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 12 नोव्हेंबर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सावंतवाडी खरेदी विक्री संघाची निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व भाजपचे आमदार नितेश राणे हे एकत्र आले आहे. भाजपचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. सावंतवाडी खरेदी विक्री संघाची निवडणुकीसाठी एकूण 15 जागा असून एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. भाजपचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. तर उर्वरीत 14 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात असून सत्ताधारी शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट अशी युती असून एकास एक लढत होत आहे. (नाशिकने वाढवलं शिंदेंचं टेन्शन! दादा भुसेंच्या बैठकीला सुहास कांदेंची दांडी) महाविकास आघाडीला खाली खेचण्यासाठी शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व भाजपचे आमदार नितेश राणे हे एकत्र आले असून या दोघांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शिंदे गटाचे अशोक दळवी, विद्यापन जिल्हा बँक संचालक विद्या बांदेकर हे मैदानात उतरले आहेत. तर या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील हा खरेदी विक्री संघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेसचे विकास सावंत हे मैदानात उतरले आहेत. सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत मतदान होणार असून चार नंतर काही काळ विश्रांतीनंतर लगेचच मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. जर 14 जागांचे निकाल रात्री उशिरापर्यंत येणार असून 944 सभासद सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे भवितव्य ठरवणार आहेत. शिंदे सरकार आल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारातील पहिलीच निवडणूक दीपक केसरकर यांच्यासाठी ही महत्त्वाची प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे. (मुस्लिम मुलींनी हिंदू तरुणांसोबत लग्न केलं, मग तो कोणता जिहाद? अबू आझमींचा भाजपला सवाल) दीपक केसरकर हे आज दुपारी सावंतवाडीत दाखल होत असून त्यांचा केवळ हा धावतात दौरा असल्याचे मानले जात असले तरी दीपक केसकर यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लक्ष या निवडणुकीकडे असणार आहे. प्रत्यक्षात कुठच्याही बड्या नेत्याने या निवडणुकीत लक्ष केंद्रित केलं नसलं तरी दीपक केसरकर यांना दूर करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या स्थानिक नेतृत्वाखाली अंडरग्राउंड प्रयत्न सुरू केले आहेत. तर विनायक राऊत यांचे मनसुबे उधळण्यासाठी दीपक केसरकर हे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षरीत्या पाठबळ देताना पाहायला मिळत आहे. ही निवडणूक दोन्ही कडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.