JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा डिवचलं, आता तर थेट फडणवीसांचं नावच घेतलं!

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा डिवचलं, आता तर थेट फडणवीसांचं नावच घेतलं!

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागांवर दावा सांगण्यास सुरूवात केली. आता तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन महाराष्ट्राला डिवचायचा पुन्हा प्रयत्न केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 नोव्हेंबर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागांवर दावा सांगण्यास सुरूवात केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर केलेल्या विधानानंतर प्रतिक्रिया देताना बोम्मई यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये बोम्मई यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं आहे. काय आहे बोम्मई यांच्या ट्वीटमध्ये? ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे. 2004 पासून महाराष्ट्र सरकारनं दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. आतापर्यंत यश आलं नाही आणि यापुढंही ते येणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत’, असं ट्वीट बोम्मई यांनी केलं आहे.

महाराष्ट आणि कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकारण तापलेलं असताना आता कर्नाटकनं नवी कुरापत काढली. सांगलीतल्या जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करतंय, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधान केलं. जतमधील 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा असंही बोम्मई म्हणाले. पाण्याच्या मुद्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांनी हे मोठं विधान केलंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जत तालुक्यावर कर्नाटकनं वक्रदृष्टी टाकल्याचं स्पष्ट होतंय. ‘कर्नाटक, महाराष्ट्र वादाला काँग्रेसच जबाबदार’, भाजपकडून एस.एम. जोशींच्या ‘त्या’ पुस्तकाचा दाखला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या