जळगाव, 25 नोव्हेंबर : बेळगाव, निपाणी आणि कारवारवरून महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान केलं. महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट कर्नाटकचा भाग असल्याचं बोम्मई म्हणाले. एकनाथ खडसेंचा निशाणा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा विषय बाजूला सारण्यासाठीच भाजप बोम्मई यांच्या वक्तव्याचा लाभ करून घेत आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. भगतसिंग कोश्यारींचा विषय वळवून घेण्यासाठी बोम्मई सारख्यांकडून वक्तव्य समोर येत असल्याचं खडसे म्हणाले. कोश्यारींसह फडणवीस निघाले दिल्लीला, राज्यपाल बदलीबाबत केंद्रीय स्तरावर चर्चेची शक्यता काय म्हणाले बोम्मई? ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे. 2004 पासून महाराष्ट्र सरकारनं दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. आतापर्यंत यश आलं नाही आणि यापुढंही ते येणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत’, असं ट्वीट बोम्मई यांनी केलं. काय म्हणाले होते राज्यपाल? ‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरी, शरद पवारांपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी गडकरी आणि पवारांची तुलना महापुरुषांशी केली. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला. उद्धव ठाकरे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांना पदावरून पायउतार करण्याची मागणी केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा डिवचलं, आता तर थेट फडणवीसांचं नावच घेतलं!