JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / यापूर्वीच्या आयुक्तांनी केलं ते विपीन शर्मांना का नाही जमत? कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर विचारला जातोय सवाल

यापूर्वीच्या आयुक्तांनी केलं ते विपीन शर्मांना का नाही जमत? कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर विचारला जातोय सवाल

कल्पिता पिंपळे हल्ला प्रकरणी ठाणे मनपाचे आयुक्त विपीन शर्मा यांना घटनेचं गांभीर्य नाहीये का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 4 सप्टेंबर : ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे (TMC Officer Kalpita Pimple) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा (TMC Commissioner Vipin Sharma) हे नक्की करताहेत तरी काय? अशी जोरदार चर्चा ठाण्यात सुरु झालीये. कारण याआधी महानगरपालिकेच्या एका अधिका-यावर जीवघेणा हल्ला (attack on TMC officers) झाला होता त्यावेळेस तत्कालीन आयुक्तांनी स्वत: फेरीवाला आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना चोप दिला होता. तर हजारो फेरीवाले (hawkers) आणि अनधिकृत बांधकामे (Illegal construction) जमिनदोस्त केले होते. पण आताचे आयुक्त तर एसी केबीनच्या बाहेरच पडत नाहीत. 14 मे 2017 ही तारीख ठाण्यातील एकही व्यक्ती विसरणार नाही अगदी अनधिकृत बांधकामे करणारे आणि फेरीवाले देखील. कारण याच दिवशी ठाण्यात कल्पिता पिंपळे यांच्या प्रमाणेच तत्कालीन अधिकारी संदिप माळवी यांच्यावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी जिवघेणा हल्ला केला होता. ज्यात संदिप माळवी थोडक्यात बचावले होते. पण या हल्ल्यामुळे नाही तर या हल्ल्यानंतर तत्कालीन आयुक्त संजीव जैस्वाल यांनी अनधिकृत फेरीवाले आणि अवैधरित्या पार्किंग केलेल्या रिक्षावाल्याला चोप दिला होता आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाली होता.

तत्कालीन आयुक्त संजीव जैस्वाल फक्त रस्त्यावर उतरले नव्हते तर त्यांनी एकाच दिवसात 200 पेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम स्वत: उभे राहून तोडली होती. शिवाय ठाणे फेरीवाला मुक्त केले होते. मग जग संजीव जैस्वाल यांनी इतकी मोठी कारवाई केली होती तर दुसरीकडे विद्यमान आयुक्त विपीन शर्मा यांनी अजून एकही कारवाई केली नाहीये. कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याला ठाणे मनपा आयुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस जबाबदार? महत्त्वाची कागदपत्रे न्यूज 18 लोकमतच्या हाती

कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या अमरजीत यादवला पोलिसांनी अटक केलीय. त्याच्या कायदेशीर कारवाई होईलच. पण ठाणे महानगरपालिकेच्या आत असलेले अमरजीत यादव जे अशा हल्लेखोरांना पोसतात ज्यामुळे हल्ला करण्याचे धाडस फेरीवाले करतात त्यांच्यावर कारवाई करणार कोण? कारण आयुक्त अजुन कारवाईच्या मूडमध्ये दिसत नाहीयेत. यावरुनच ठाणेकर जनता विचारतयेये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त नक्की करताहेत काय?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या