मुंबई, 03 डिसेंबर : मागच्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील मुंब्रा येथे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत विवीध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे ही उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर ते गर्दीतून वाट काढत असतना महिलेला हात लावल्याप्रकरणी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित असुनही यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नव्हती.
यानंतर जितेंद्र आव्हाड यांना आज पुन्हा एका सार्वजनीक कामाच्या उद्घाटनाची पत्रिका आली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि आव्हाड पुन्हा एका व्यासपीठावर असणार आहेत. पण आव्हाड यांनी खोचक ट्विट करत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा : ‘75 वर्षांत काही दिलं आता आम्हाला जाऊ द्या’, सोलापूरमधील गावकऱ्यांनी फडकावले कर्नाटकचे झेंडे
जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या केस प्रकरणी प्रचंड मानसीक त्रास झाल्याचे बोलून दाखवले होते. दरम्यान त्यांना पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या असेलेल्या कार्यक्रमाला उपस्थितीत रहायचे आहे. यावरून त्यांनी ट्वीट करत टोला मारला आहे. आव्हाड म्हणतात की, मी मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील, असा खोचक टोला आव्हाडांनी लगावला आहे.
आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे. महापालिकेने मलाही आमंत्रण दिलं आहे. पण ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या 8 फूट अंतरावर माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला. ते स्वतः या घटनेचे साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील…. असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.
हे ही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारला कोर्टाचा दणका; राज्य सरकारच्या त्या महत्त्वाच्या निर्णयाला स्थगिती
त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेलं बरं! परत पोलीस म्हणतील दबाव होता. मुख्यमंत्री म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही… तुला कसं कळत नाही… खरंच कळत नाही… चलो ये वक्त भी गुजर जायेगा, असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.