जालना, 2 जून : जालन्यात शुल्लक वादातून भरदिवसा एका इसमाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय. या घटनेत संबंधित इसम पन्नास टक्के भाजला असून त्याच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील टाऊन हॉल भागात सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी या वादाचे पर्यावसान पेट्रोल अंगावर टाकून पेटवून देण्यात झालं. संबंधित घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मंडाळ नामक व्यक्ती इमारतीच्या वाहन पार्किंगमध्ये खुर्चीवर बसून तेथील कामगारांसोबत चर्चा करत होता. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या देशमुख नामक व्यक्तीने मंडाळ यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी मंडाळ यांना लागलेली आग विझवली. आणि तातडीने औरंगाबाद येथे रुग्णालयात हलविले. ( ‘रोज मंदिराचा मुद्दा काढणे योग्य नाही’ ज्ञानवापी वादावर मोहन भागवत यांचे परखड मत ) संबंधित घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. इमरातीच्या तळमजल्यावर काही लहान मुलं खेळताना दिसत आहेत. ते खेळत असताना एक व्यक्ती धावत येते. या व्यक्तीला आग लागलेली असते. ही व्यक्ती जीवाच्या आकांताने आग विझवण्याचा प्रयत्न करते. यासाठी ती व्यक्ती स्वत:चा शर्ट काढते. यावेळी दोन-तीन जण आग विझवण्यासाठी पुढे येतात. ते आग विझवण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश मिळतं. या घटनेत पीडित व्यक्ती 50 टक्के भाजली आहे.
पीडित व्यक्ती 50 टक्के भाजला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. स्थानिक पोलीस मात्र दुपारपर्यंत याबाबत अनभिज्ञ होते. औरंगाबादच्या सातारा पोलिसांनी कळविल्यानंतर आता कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.