JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जळगाव : चर्चा तर होणारचना भाऊ! भल्याभल्यांचा बँड वाजवत बँडवाला बनला सरपंच, पॅनलही केलं विजयी

जळगाव : चर्चा तर होणारचना भाऊ! भल्याभल्यांचा बँड वाजवत बँडवाला बनला सरपंच, पॅनलही केलं विजयी

मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील 122 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे अंतुर्ली खूर्द ग्रामपंचायत निकालाची. एका सामान्य बँडवाल्यानं सरपंचपदाची निवडणूक जिंकली आहे. एवढंच नव्हे तर आपला पॅनलही विजयी केला आहे.

जाहिरात

कांतीलाल सोनवणे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 21 डिसेंबर : जिल्ह्यातील 122 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. मंगळवारी निकाल लागला. यामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला सर्वाधिक 55 , ग्रामपंचायती आल्या,  33 ग्रामपंचायतींसह भाजप दुसऱ्या तर शिंदे गटाला 16, काँग्रेसला 10 आणि शिवसेना ठाकरे गटाने 4 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. मात्र जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे अंतुर्ली खूर्द ग्रामपंचायत निकालाची. त्याला कारण देखील तसेच आहे, अंतुर्लीतील एका सामान्य नागरिक प्रस्तापितांना धक्का देत  सरपंच बनला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी आपले संपूर्ण पॅनलही निवडून आणले. कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता विजय   एरंडोल तालुक्यातील अंतुर्ली खुर्द या ग्रामपंचायतीवर कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता चक्क एक बँडवाला सरपंच म्हणून निवडून आला आहे. फक्त स्वतःच नाही तर या बँडवाल्याने आपले संपूर्ण पॅनलही विजयी केले आहे. कांतीलाल गणसिंग सोनवणे असं या बँडवाल्याचं नाव आहे.  मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाला लागला. यामध्ये कांतीलाल सोनवणे हे सर्वांना धक्का देत सरपंचपदाच्या निवडणुकीत विजीयी झाले आहेत, एवढेच नव्हे तर त्यांनी आपलं अख्ख पॅनलही विजयी केलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात या ग्रामपंचयत निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगली असून, कांतीलाल यांचं कौतुक होत आहे. हेही वाचा :   Gram Panchayat Election Result : भाजी विक्रेत्यानं केलं दिग्गजांना चित, सरपंचपदी झाली निवड! बँडचा व्यवसाय   कांतीलाल सोनवणे हे अंतुर्ली खुर्दमध्ये वास्तव्याला आहेत.  ते गायक असून त्यांचा बँडचा व्यवसाय आहे. लग्न सोहळे तसेच विविध कार्यक्रमात ते गायक म्हणून तसेच बँड व्यावसायिक म्हणून काम करतात. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपले नशीब आजमावण्याचे ठरविले. त्यानंतर ते थेट सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले,  एवढंच नव्हे तर कांतीलाल सोनवणे यांनी त्यांचे संपूर्ण पॅनलही या निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. हेही वाचा :    Gram Panchayat Election Result : थेट माजी सरपंचांना हरवत मनसेची कोल्हापुरातल्या ग्रामपंचायतीत एन्ट्री ग्रामस्थांची साथ   ग्रामस्थांनीही मतदानाच्यामाध्यमातून कांतीलाल सोनवणे यांना आणि त्यांच्या पॅनलला साथ दिली. याचाच परिणाम म्हणजे कांतीलाल सोनवणे हे सर्वांना धक्का देत सरपंच झाले. 513 मतांनी कांतीलाल सोनवणे यांचा विजय झाला. तर त्यांच्या पॅनलमधील उमेदवार गौरव गोकुळ पाटील, कविता रघुनाथ भिल, हर्षा गौरव पाटील, राहुल दिनकर पाटील, सोनाली गोविंदा पाटील, अनिल आधार जवरे, प्रतिभा महेंद्रसिंग पाटील हे देखील विजयी झाले आहेत.  पहिल्याच निवडणुकीत नशीब आजमावून निवडणुकीत थेट सरपंचपदाची माळ गळ्यात पडल्यानं कांतीलाल सोनवणे यांची जळगाव जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या