नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 13 मे : जळगावात दूध फेडरेशनवर शुक्रवारी रात्री तुफान राडा झाला. दूध फेडरशेनच्या टँकरवर काम करणाऱ्या एका टँकर चालकाचं शुक्रवारी सकाळी अपघाती निधन झालं. या टँकरच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून दूध फेडरेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं. मृतकाचे नातेवाईक मृतदेह घेऊन दूध फेडरशनबाहेर आले होते. त्यांनी फेडरशेनाहेर ठिय्या आंदोलन केलं. तसेच फेडरेशनच्या आत मृतदेह घेऊन शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी पोलीस आणि आंदोलन करणारे मृतकाचे नातेवाईक यांच्यात धक्काबुक्की झाली. संबंधित ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी फेडरशेनबाहेर मोठा गोंधळ उडाला. या घटनेचे व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
( 100 पेक्षा जास्त जणांना रेस्क्यू, 26 जणांचे मृतदेह, दिल्लीत आग्नितांडवाने हाहा:कार ) मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावाजवळ आज सकाळी दूध टँकरचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दूध टँकर चालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतक टँकर चालकाच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी नातेवाईकांनी शिवाजी नगरातील दूध फेडरेशनसमोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी मृतकांच्या नातेवाईकांनी टँकर चालकाचा मृतदेह देखील आणला होता. जोपर्यंत आम्हाला नुकसानभरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही प्रेत हलविणार नाही, असा त्यांनी पवित्रा घेतला. यावेळी दूध फेडरेशन प्रशासनाने कुटूंबीयाशी संवाद साधून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, दूध फेडरेशनमध्ये मृतकाच्या कुटुंबियांना परमनंट नोकरी मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.