JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अंगात भूत संचारलंय म्हणत पुजाऱ्याने केली महिलेला मंदिरात अमानुष मारहाण, LIVE VIDEO

अंगात भूत संचारलंय म्हणत पुजाऱ्याने केली महिलेला मंदिरात अमानुष मारहाण, LIVE VIDEO

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन हा गुन्हा दाखल केला.

जाहिरात

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन हा गुन्हा दाखल केला.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नालासोपारा,18 सप्टेंबर : भूत (ghost ) काढण्याच्या नावाखाली एका महिलेला मंदिरात भोंदूबाबाने बेदम मारहाण केल्याची घटना नालासोपाऱ्यात समोर आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अखेर दोन दिवसांनी या भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यात एका मंदिरामधील भोंदूबाबा हेमंत नागनाथ याने एका महिलेला पकडून अमानुषपणे मारहाण केली होती. या महिलेच्या अंगात भूत संचारले असून ते बाहेर काढतो, असं सांगत तो मारहाण करत होता. पीडित महिलेनं त्याला नकार दिला तरीही त्याने या महिलेला मारहाण करण्याचे काही थांबवले नाही. ही संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या वंदना शिंदे यांनी या प्रकरणी  मारहाण करणाऱ्या भोंदू बाबांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. अखेर दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंनिसच्या तक्रारीवरून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, व जादूटोणा यांना प्रतिबंध करणेबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करणे बाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाऐवजी काढ्यानेचे पाडलं आजारी; व्हायरसचा काटा काढता काढता बळावले इतर आजार 16 तारखेला ही घटना घडली होती. पीडित महिला घरात बेशुद्ध पडली होती. त्यानंतर तिच्या नवऱ्याने या महिलेला मंदिरात घेऊन गेला होता. त्यानंतर पुजारी हेमंत नागनाथ याने तिच्या अंगात भूत असल्याचे सांगितले आणि मारहाण केली होती, अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे, असंही सुपे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या