JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर.., बीडमध्येच ठाकरे सरकारच्या मंत्र्याकडून ऑफर

पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर.., बीडमध्येच ठाकरे सरकारच्या मंत्र्याकडून ऑफर

‘पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 17 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात (modi government cabinet reshuffle) खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे (pankaja munde) आणि त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले होते. तर दुसरीकडे, पंकजा मुंडे या शिवसेनेमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच आहे, वरिष्ठ नेते योग्य सन्मान देतील, असं सूचक विधान वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी केलं आहे. गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद देण्यात न आल्यामुळे भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वावर अन्याय झाला, अशा चर्चा रंगली आहे. यावर बोलत असताना शंभुराजे देसाई यांनी पकंजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफरच देऊन टाकली आहे. शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा! ‘पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे आणि त्या जर शिवसेनेमध्ये आल्या तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचे स्वागत होईल आणि त्यांचा योग्य मानसन्मान हा आमचे नेते करतील, असं शंभुराजे देसाई म्हणाले आहे. आपलं घर का सोडायचं? - पंकजा मुंडे विशेष म्हणजे, प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं. त्यामुळे बीड, पुणे, अहमदनगरमधील मुंडे समर्थकांनी आपले राजीनामे दिले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सुद्धा घेतली होती. आई ती आईच! वाघाच्या जबड्यात लेकीचं डोकं, जीवाची बाजी लावून केली सुटका या बैठकीनंतर पंकजा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मंत्रिपदाची मागणी हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार नाहीत. मला कधी वाटलं नाही, मला मंत्री करा संत्री करा. माझ्या समाजाच्या मंत्र्याला मी कशाला अपमानित करू. प्रीतमताई मंत्री नाही झाल्या. मी 45 वर्षांची आहे. कराड साहेब 65 वर्षाचे आहे. मी त्यांचा अपमानित करणार नाही असं म्हणत भागवत कराड यांना मिळालेल्या मंत्रिपदावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच, जोपर्यंत शक्य तोपर्यंत धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार आहे. मी कुणालाही भीत नाही. आपलं घर का सोडायचं? असा सवालाच पंकजा मुंडेंनी उपस्थितीत केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या