'३ मे रोजी जर कोणी मशीदवरील भोंगे काढायला कोणी आले तर माझे कार्यकर्ते त्यांचं संरक्षण करणार आहेत. आम्ही ही दादागिरी करू शकतो
पिंपरी चिंचवड, 23 एप्रिल : ‘3 मे रोजी जर कोणी मशीदवरील भोंगे काढायला कोणी आले तर माझे कार्यकर्ते त्याच संरक्षण करणार आहेत. आम्ही ही दादागिरी करू शकतो’ असा थेट इशाराच रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (ramdas athwale) यांनी मनसे (mns) दिला आहे. पिंपरी चिंचवड शहरात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्यावरून आपली परखड भूमिका मांडली. ‘सध्या महाराष्ट्रात भोंग्याचा विषय सुरू आहे,मशिदींवर अनेक वर्षे भोंगे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी भोंग्याला विरोध केला नाही, पण राज ठाकरे यांनी भगवे घालून भोंग्याला विरोध करू नये,आमचा भोंगे काढण्यास विरोध आहे. राज ठाकरे यांनी केलेला विरोध चुकीचा,समाज अल्पसंख्याक आहे धमकीची भाषा कोणी करू नये, असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला. ( कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की…’, वाघांच्या अमेयची पोस्ट चर्चेत ) ‘राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण यांच्या वेळ प्लॅनड असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पण सभा मोठ्या होत होत्या. त्यांनी भगवा झेंडा केला आनंद आहे त्यांना भगवा हवा होता तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती, शिवसेना कार्यप्रमुख म्हणून राज ठाकरे यांनीच नाव सुचवलं होतं पण परत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीकाही रामदास आठवलेंनी केली. ‘३ मे रोजी जर कोणी मशीदवरील भोंगे काढायला कोणी आले तर माझे कार्यकर्ते त्यांचं संरक्षण करणार आहेत. आम्ही ही दादागिरी करू शकतो पण आम्हाला दादागिरी येत. पोलिसांनी यात लक्ष घालण गरजेचे आहे. मुस्लिम नेत्यांनी पण संयम पाळला पाहिजे, अजान थोडा वेळाची असते. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे, असंही आठवले म्हणाले. ‘मराठा समाज आरक्षण, भूमिहिन शेतकऱ्यांना जमीन मिळावी या आणि अशा अनेक मागणीसाठी येत्या १० मे ला राज्यात जिल्हाधिकारी कार्यलय येथे आंदोलन रास्ता रोको करण्यात येणार आहे, अशी माहिती आठवलेंनी दिली. ( पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालक आला जवळ, पुढे काय घडलं? ) महापालिका जिल्हा परिषद निवडणुका भाजपसोबत लढणार तर जिकडे युती होणार नाही तिकडे स्वबळावर लढणार आहे. मुबंई पुण्यात युती होणारआहे . मुबंईमधील सत्ता उलथवून टाकण्याच प्लॅनिंग आमचं आहे. यावेळी जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. मुबंईमध्ये भाजपचा महापौर झाला तर आम्हाला उपमहापौर मिळावे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला. ‘मनसे आरपीआयची जागा भाजपमध्ये घेणार नाही,राज ठाकरे यांना सोबत घेतला तर मतदार नाराज होऊ शकतो, त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपने सोबत घेऊ नये असं माझं मत आहे,आमचं अस्तित्व संपणार नाही, असंही आठवले म्हणाले. ( आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण, काय आहेत सध्याचे दर? ) ‘शरद पवार यांच्यामुळे जातीवाद वाढला नाही, असं माझं मत आहे पण त्याच्या काही लोकांमुळे जातीवाद वाढला आहे,अमोल मिटकरी सारखे लोक आहेत जे समाजात तेढ निर्माण करतात, मिटकरीचा निषेध व्यक्त करतो,पवार जातीवादी नाहीत, असंही आठवले म्हणाले. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये. तिकडे मुस्लीम समाज जास्त आहे त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो त्यामुळे सभेला परवानगी देऊन राज ठाकरे राज्यात वाद निर्माण करत फिरत आहेत. समाजात वाद निर्माण होत असेल तर सरकारने लक्ष घातले पाहिजे, असं परखड मतही आठवले यांनी व्यक्त केलं.