JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मला सरप्राईज गिफ्ट मिळालं', फडणवीसांनी जाहीर सभेत बोलून दाखवली नाराजी

'मला सरप्राईज गिफ्ट मिळालं', फडणवीसांनी जाहीर सभेत बोलून दाखवली नाराजी

‘मला दिल्लीतील नेत्यांनी सरप्राईज गिफ्ट दिले, मुख्यमंत्री ऐवजी मला आमच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री करून सरप्राईज दिले

जाहिरात

'मला दिल्लीतील नेत्यांनी सरप्राईज गिफ्ट दिले, मुख्यमंत्री ऐवजी मला आमच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री करून सरप्राईज दिले

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. पण, मुख्यमंत्रिपदाची धुरा न दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले होते. आता खुद्द फडणवीस यांनीच ‘मला दिल्लीतील नेत्यांनी सरप्राईज गिफ्ट दिले, मुख्यमंत्री ऐवजी मला आमच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री करून सरप्राईज दिले, असं म्हणत फडणवीस यांनी नाराजी जाहीर सभेत बोलून दाखवली. विनायक मेटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा वसईमध्ये पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (devendra fadanvis) अशा घोषणा दिल्यात. ‘मला दिल्लीतील नेत्यांनी सरप्राईज गिफ्ट दिले, मुख्यमंत्री ऐवजी मला आमच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री करून सरप्राईज दिले, असं म्हणत फडणवीस यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. सर्व आरक्षण घालवायचं काम महाविकास आघाडीने काम केल, आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी आलो नाहीत. महाराष्ट्रातील महिला ओबीसीच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी आलो आहेत. सर्वांना सरप्राईज गिफ्ट मिळेल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. ( Women@75: समुद्र असो की आकाश, या महिलांसमोर सगळेच झुकतात ) आमच्या काळात छोट्यात घटकांना भेटायचो. सर्व घटक पक्षांना सत्तेत वाटा देऊ. मराठा आरक्षणच्या संदर्भात कायदा केला, उच्च न्यायलयात लढलो, तामिळनाडू नंतर मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण दिलं. पण आधीच्या सरकारने काय केल हे सर्वाना माहित आहे. आज अवघड मार्ग आहे जे सरकारने करायला पाहिजे ते केलं नाही, सारथीच्या चौकशी लावली ते बंद करण्यासाठी केले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या