JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / प्रेमविवाहानंतर पतीच जीवावर उठला; अमानुष कृत्यानं 8 वर्षांच्या संसाराचा झाला हृदयद्रावक शेवट

प्रेमविवाहानंतर पतीच जीवावर उठला; अमानुष कृत्यानं 8 वर्षांच्या संसाराचा झाला हृदयद्रावक शेवट

Murder in Beed: बीड शहराच्या पेठ परिसरातील मासिक कॉलनीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Husband killed wife) केली आहे.

जाहिरात

(File Photo)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 12 सप्टेंबर: बीड  (Beed) शहराच्या पेठ परिसरातील मासिक कॉलनीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (wife’s brutal murder) केली आहे. मुलं घराबाहेर खेळत असताना, आरोपी पतीनं आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या (Wife  murder by strangulation) केली आहे. या घटनेची माहिती आरोपी पतीनं स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन दिली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे. पेठ बीड पोलीस आरोपीची चौकशी करत असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. शेख याकूब शेख खुदबुद्दीन असं आरोपी पतीचं नाव असून तो बीड शहरातील मासिक कॉलनीतील रहिवासी आहे. तर शेख मल्लिका शेख याकूब असं हत्या झालेल्या 38 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील रहिवासी असणाऱ्या मृत मल्लिका यांचा  8 वर्षांपूर्वी याकूबसोबत प्रेमविवाह झाला होता. या दाम्पत्याला तीन मुलंही आहेत. पण प्रेम विवाह झाल्यानंतर याकूब आणि मल्लिका यांच्यात सतत वाद होऊ लागले. हेही वाचा- मांत्रिकाच्या मदतीनं पतीला ब्लॅकमेल करत मागितले 1कोटी; कोथरूडमधील महिलेचा प्रताप आरोपी पती याकूब अनेकदा पत्नी मल्लिकावर चारित्र्याच्या संशयावरून वाद घालायचा. दरम्यान, शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास दाम्पत्याची तिन्ही मुलं घराबाहेर खेळत होती. यावेळी याकूब आणि मल्लिकात यांच्यात याच कारणातून जोरदार वाद झाला होता. या वादातून संतापच्या भरात आरोपीनं मल्लिकाचा गळा दाबला, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. पण तरीही आरोपी थांबला नाही, यानंतर त्यानं उशीनं तोंड दाबून मल्लिकाची हत्या केली आहे. हेही वाचा- अन्नावाचून मायलेकींनी घरातच तडफडून सोडला प्राण; चंद्रपुरातील हृदय हेलावणारी घटना पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी याकूब स्वत: पेठ बीड पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीच्या हत्येची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्वरित आरोपीला ताब्यात घेत, त्याला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मल्लिका यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी  पाठवून दिला. शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेची सखोल चौकशी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या