JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उपाशी लहान मुलं कचऱ्यातून गोळा करत आहे अन्न, खेडमधला मन हेलावून टाकणारा VIDEO

उपाशी लहान मुलं कचऱ्यातून गोळा करत आहे अन्न, खेडमधला मन हेलावून टाकणारा VIDEO

हे चित्र आपल्याला विचलित करू शकते पण ही वस्तुस्थिती आहे खेड मधल्या झोपडपट्टीतील बेघर झालेल्या लोकांची आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

खेड,  24 जुलै : रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुराच्या पाण्याने अनेकांचे संसार हे उघड्यावर पाडले आहे. खेडमध्ये (khed) पुरामुळे बेघर झालेल्या झोपडपट्टीतील लहान लहान मुलं कचऱ्यातून (garbage) अन्न शोधत असल्याचा मन हेलावून टाकणारा विदारक व्हिडीओ समोर आला आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मध्ये जगबुडी नदीला पूर आला आणि या पुरात होत्याच नव्हतं झालं. याच जगबुडी नदी किनारी असणारी झोपडपट्टी पुराच्या पाण्यात वाहून गेली. आणि या झोपडपट्टीतील सुमारे 50 हुन अधिक लोक बेघर झाले आहे.

संबंधित बातम्या

खबरदारीचा उपाय म्हणून या लोकांना एका शाळेत निवारा दिला आहे पण अन्न आणि पाण्यावाचून मात्र त्यांचे हाल होऊ लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून बेघर असलेले झोपडपट्टीतील लहान लहान मुले बाजारपेठेत पुरच्या पाण्याने खराब झालेले अन्न, खाऊचे पुडे व इतर खाद्य पदार्थ गोळा करून आपला उदार निर्वाह करत आहेत. भारतात नाही प्रोटीनबद्दल जागृती; किती घ्यावं? हेच माहित नसतं शहरात व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात खराब झालेल्या दाळी, तांदूळ , गहू, असे पाण्याने भिजलेले धान्य टाकून द्यावे लागले आहे. हेच खराब झालेले खाद्य पदार्थ, वस्तू नगरपालिका जगबुडी नदी किनारी असलेल्या कचरा डेपोत आणून टाकत आहे. आणि याच कचरा डेपोत झोपडपट्टीतील लहान लहान मुले आणि लोक टाकून दिलेले अन्न पदार्थ गोळा करताना दिसत आहे. हे चित्र आपल्याला विचलित करू शकते पण ही वस्तुस्थिती आहे खेड मधल्या झोपडपट्टीतील बेघर झालेल्या लोकांची आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या