JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सावधान! कोरोना व्हायरसच्या नावाखाली विकले जाणारे कापडी मास्क किती सुरक्षित?

सावधान! कोरोना व्हायरसच्या नावाखाली विकले जाणारे कापडी मास्क किती सुरक्षित?

कापडी मास्क व यासाठी वापरल्या जाणाऱ्या कापड उत्पादनास मोठी मागणी आहे. पण हे कापडी मास्क किती सुरक्षित आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कन्हैया खंडेलवाल,(प्रतिनिधी) हिंगोली,20 मार्च: संपूर्ण जगात महामारी रुप घेतलेल्या कोरोना व्हायरसमुळे दहशत पसरली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून मास्कचा वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. परिणामाी कापडी मास्क व यासाठी वापरल्या जाणाऱ्या कापड उत्पादनास मोठी मागणी आहे. पण हे कापडी मास्क किती सुरक्षित आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महिला बचत गटांकडून शिवून घेतलेले कापडी मास्क नागरिकांना वाटप करण्यासाठी देण्यात येत आहेत. अनेक संघटना, शासकीय कार्यालय व एनजीओमार्फत मास्क बनवून नागरिकांना वाटप करण्यात येत आहे. तसेच मेडिकलवरही मास्क मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. हेही वाचा…  1 ते 8 वीपर्यंत परीक्षा रद्द, नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर कापड किती निर्जंतुक? मास्क बनवताना कारागीर स्वच्छतेचा किती प्रमाणात वापर करताहेत? मास्क बनवलेला कापड किती निर्जंतुक आहेत? मास्क हाताळताना त्याची योग्य निगा घेतलेली आहे? प्रसिद्धी देण्यासाठी कॅमेरासमोर मास्क वाटप करणारे स्वतः च्या हाताने नागरिकांना मास्क घालत आहेत. मास्क घालण्याच्या हात किती स्वच्छ आहेत? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एकीकडे शासन प्रशासन स्वच्छतेवर भर देत आहेत. मात्र जर हे मास्क अस्वच्छ असले तर यामुळेच अनेक रोग पसरू शकतात, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. हेही वाचा..  शस्त्रक्रिया झालेले उद्धव ठाकरे सेनापतीप्रमाणे लढत आहेत, जितेंद्र आव्हाड भावुक वापरलेल्या मास्कची अशी लावा विल्हेवाट… कोरोनाच्या भीतीमुळे बहुतांश नागरिक मास्क वापरताना दिसत आहे. कापडी मास्क वापरण्यापूर्वी तो गरम पाण्यात 10-15 मिनिटे भिजत ठेवावा. गरम पाण्यात डेटॉल मिसळावे. नंतर कडक उन्हात वाळत घालावा. मात्र, वापरलेल्या मास्कची विल्हेवाट कशी लावावी, याबाब संभ्रम आहे. नागरिकांनी मास्क वेगळ्या पिशवीत बांधून ती सुक्या कचऱ्यासोबत जमा करावी. तसेच ज्यांच्याकडे सर्जिकल मास्क असेल तर ते त्यांनी वापर केल्यानंतर जवळच्या रुग्णालयात जमा करावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या