राजापूर तालुक्यातील बारसू माळरानावर गावकऱ्यांनी निलेश राणेंचा ताफा अडवला.
रत्नागिरी, 21 ऑगस्ट : रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या जागी स्थानिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांचा ताफा अडवला आहे. बारसू गावकऱ्यांनी ताफा अडकवल्या आणि निलेश राणे (nilesh rane) यांना थेट जाब विचारला, त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. रिफायनरी संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे चालले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येनं रिफायनरी विरोधकांनी निलेश राणेंचा ताफा अडवला. बारसू या गावात प्रस्तावित रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध केला आहे. राजापूर तालुक्यातील बारसू माळरानावर गावकऱ्यांनी निलेश राणेंचा ताफा अडवला. नाणारमध्ये होणारी ऑईल रिफायनरी ही विनाशकारक आहे, मग आमच्या गावासाठी चांगली कशी आहे, असा सवाल करत गावकऱ्यांनी निलेश राणेंना अडवलं. (काँग्रेसमध्ये हयात घालवलेले राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात आता काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे?) यावेळी, आपण सगळे बसून बोलूया, प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांशी बोलून याबाबत तोडगा काढणार असं आश्वासन निलेश राणेंनी दिलं. पण गावकरी काही केलं ऐकायला तयार नव्हते. जवळपास अर्धातास गावकऱ्यांनी निलेश राणेंचा ताफा अडवला होता. (हरिहरेश्वरमध्ये सापडलेल्या बोटीतील फ्रीजमध्ये…., निलेश राणेंचा खळबळजनक दावा) शनिवारी सुद्धा गावकऱ्यांनी बारसू परिसरात रिफायनरीचे सर्वेक्षण रोखले होते. पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी ठेकेदार सर्वेक्षण करत होते. मात्र तिथले स्थानिक रोखण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना मजाव केला. पोलीस आणि स्थानिक यांच्यामध्ये बाचाबाची झाली, या स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी व या बारसू सोलगाव आले होते, पण त्यांना स्थानिकांनी विरोध केला.