मुंबई, 14 मार्च: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब आरोपांवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) विधानसभेत उत्तर देणार आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात कोणालाही फसवण्याचा प्रयत्न नाही. त्यामुळे विरोधकांनी आता हा वाद थांबवावा असं आवाहन दिलीप वळसे-पाटील यांनी केलंय. कामकाज पत्रिकेत दाखवल्या नुसार उत्तर दिलं जाईल. त्यांच्याकडे असे किती बॉम्ब आहेत हे त्यांचं त्यांनाच माहिती, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. आज महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) हे विधानसभेत लक्षवेधी झाल्यानंतर यासंदर्भात बोलणार आहेत. यापूर्वी त्यांनी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या मुद्यावरून भाजपने विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात याबाबत निवेदन सादर केलं. मुंबईतल्या केमिस्ट्री पेपर फुटीप्रकरणी वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी म्हटलं की, फोन टॅपिंग प्रकरणी अज्ञातांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 24 जणांचे जबाब नोंदवण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांना याबाबत याआधीच प्रश्नावली पाठवण्यात आली होती. मात्र, त्यांना काही कारणास्तव त्याला उत्तर देणे शक्य झालं नसल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या नोटीशीनुसार, फक्त जबाब नोंदवण्यासाठीची नोटीस आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटीस ही आरोपी म्हणून दिली नसल्याचंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. या फोन टॅपिंग प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहून तो पेनड्राइव्ह मिळण्यासाठीची मागणी करण्यात आली असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.