Home /News /mumbai /

मुंबईतल्या केमिस्ट्री पेपर फुटीप्रकरणी वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया

मुंबईतल्या केमिस्ट्री पेपर फुटीप्रकरणी वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया

मुंबईत शनिवारी झालेला बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर (Chemistry paper leak) मुंबईत फुटल्याचा उघड झालं. या प्रकरणावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 14 मार्च: मुंबईत शनिवारी झालेला बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर (Chemistry paper leak) मुंबईत फुटल्याचा उघड झालं. याप्रकरणी खासगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विले पार्ले (Vile Parle police) पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विलेपार्ल्यातील एका केंद्रावर विद्यार्थिनीच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिकेतील काही भाग आढळून आला आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाटप झाल्यानंतर whatsapp द्वारे प्रश्नपत्रिकेचा काही भाग आढळला असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल; म्हणाले...'' हे मान्य आहे का?'' पेपर फुटला नाही. प्रश्नपत्रिकेचं वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. 10.20 ला प्रश्नपत्रिकेचं वाटप झालं. एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता तेव्हा तिचा फोन चेक केला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये 10.24 वाजता आढळून आला असल्याचं त्या म्हणाल्यात. प्रश्नपत्रिका 10 मिनीटं आधी वाटली जाते. विद्यार्थी 10.30 वाजता पेपर लिहिण्यास सुरुवात करतात, असं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु असल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली. मुंबईत 12 वीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला शनिवारी झालेला बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर (Chemistry paper leak) मुंबईत फुटल्याचा उघड झालं आहे. खासगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विले पार्ले (Vile Parle police) पोलिसांनी अटक केली आहे. मुकेश यादव असा या खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. या खासगी शिक्षकानं आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर हा पेपर सुरु होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी या तीन विद्यार्थ्यांची चौकशी सुद्धा पोलिसांनी केली आहे. मुकेश ला पेपर कोणी दिला? यासाठी किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला ? आणि त्याने यापूर्वी काही पेपर विद्यार्थ्यांना दिली आहेत का? या सगळ्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. हा पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला याची सुद्धा माहिती पोलीस घेत आहेत. मात्र आतापर्यंत या माहितीमध्ये तीन विद्यार्थ्यांकडे हा पेपर Whatsapp वर आला असल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai, Varsha gaikwad

    पुढील बातम्या