JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पंढरपुरात 'हिवसाळा'; ऐन डिसेंबरमध्ये धुवाँधार पाऊस

पंढरपुरात 'हिवसाळा'; ऐन डिसेंबरमध्ये धुवाँधार पाऊस

पंढरपूर शहरासह परिसरात मोठा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंढरपूर, 12 डिसेंबर :  गेल्या दोन दिवसांपासुन राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. थंडीचा जोर वाढण्याऐवजी ऐन डिसेंबर महिन्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पंढरपूर शहरासह परिसरात मोठा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

संबंधित बातम्या

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक भागात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरीही पडल्या. तर पुण्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने येत्या दोन दिवसात राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली. हेही वाचा :  Weather Update: पुणे, मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांत आजही मुसळधार पाऊस; वातावरणात गारवा वाढला राज्यात रविवारी दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, पुण्यात पाऊस पडला. तर येत्या दोन दिवसात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या