JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भंडारा-गोंदियात पावसाचा हाहाकार, गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले

भंडारा-गोंदियात पावसाचा हाहाकार, गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले

पाऊस इतका कोसळतोय की भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे दोनवेळा सर्वच्या सर्व दरवाजे उघडले आहेत.

जाहिरात

गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नेहाल भुरे, भंडारा, 13 सप्टेंबर : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. मुंबई, ठाण्यापासून राज्यातील अनेक वेगवगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये देखील तशीच अवस्था आहे. पाऊस इतका कोसळतोय की भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे दोनवेळा सर्वच्या सर्व दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. पावसाचा कहर हा भंडारा पाठोपाठ गोंदिया जिल्ह्यातही पाहायला मिळतोय. भंडारा जिल्ह्यात आज पडलेल्या पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले आहेत. यापैकी 23 दरवाजे हे 1 मीटरने तर 10 गेट अर्ध्या मीटरने उघडले आहेत. धरणातून 6263 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भंडारा जिल्ह्यात सतत पावसाने गोसीखुर्द धरणात पाण्याची आवाक अद्यापही वाढत आहे. गोसीखुर्द धरणात पाणी पातळीत आज दिवसभरात दुसऱ्यांदा वाढ झाल्याने संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघण्यात आले आहेत. यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असून नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ( अबब! पाऊस अजून एवढे दिवस थांबणार, मुंबईकरांनो सावधान तुंबई होणार ) भंडारा पाठोपाठ गोंदिया जिल्ह्यातही पावसाची तशीच अवस्था आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. गोंदिया तालुकासह दोन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तर येत्या दोन दिवसातसुद्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पाऊस असणार आहे, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. गोंदिया जिल्हा हा येलो अलर्टमध्ये आहे. जिल्ह्यात आजही अनेक ठिकाणी मुसळदार पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे जिल्ह्यात गारवा निर्माण झाला आहे. पण दुसरीकडे शेतकरी पुन्हा चिंतेत आला आहे. राज्यात 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार राज्याच्या काही भागांमध्ये 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर काही भागांत पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान, वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या