JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आदित्य ठाकरेंसाठी पाऊस मोठी संधी घेवून येणार? सिंधुदुर्गात स्वागतासाठी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी, पाहा VIDEO

आदित्य ठाकरेंसाठी पाऊस मोठी संधी घेवून येणार? सिंधुदुर्गात स्वागतासाठी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी, पाहा VIDEO

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची शिवसंवाद यात्रा ही आज रत्नागिरीत येवून पोहोचली आहे.

जाहिरात

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, आदित्य ठाकरेंसाठी शिवसैनिकांची तुफान गर्दी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिंधुदुर्ग, 16 सप्टेंबर : पाऊस आणि राजकारण यांचा जवळचा संबंध आहे. कारण पाऊस जास्त पडला तरी आणि कमी पडला तरी राजकीय नेत्यांसाठी काम करण्याची एक चांगली संधी घेवून येतो. सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी बऱ्याचदा पाऊस चुकीच्या वेळी पडला तर त्यांचं प्रचंड नुकसान होतं. पण राजकीय नेत्यांसाठी तसं नसतं. उलट चुकीच्या वेळी पाऊस पडला तर राजकीय नेत्यांची भरभराट होते. त्याचं ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे साताऱ्यात सभेला भाषण करत असताना पडलेला पाऊस. या पावसाने साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत छत्रपती घराण्याचे वंशज असलेले उदयनराजे भोसेल यांचा पराभव करुन दाखवला. लोकशाही खूप ताकदवान आहे याचं दर्शन घडवलं आणि शरद पवारांची लोकप्रियता आणखी वाढण्यात मदत झाली. त्या पावसाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप मोठा फायदा झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अमेरिकेत निवडणूक पार पडली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष असलेले जो बायडन यांच्या सभेतही पाऊस प्रचंड कोसळला. विशेष म्हणजे त्या पावसात जो बायडन यांनी भिजत केलेल्या भाषणाची जगभरात दखल घेतली गेली आहे. आता पाऊस हीच संधी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी घेवून आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची शिवसंवाद यात्रा ही आज रत्नागिरीत येवून पोहोचली आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिवसंवाद यात्रेतील आदित्य ठाकरेंची भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेला आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ आलेल्या शिवसैनिकांची प्रचंड गर्दी बघायला मिळतेय. एकीकडे मुसळधार पाऊस पडतोय. दुसरीकडे आदित्य ठाकरेंची सभा, पण शिवसैनिकांमधील उत्साह अजिबात कमी झालेला नाही. शेकडो शिवसैनिक हातात छत्री घेवून शिवसंवाद यात्रेसाठी दाखल झाले आहेत. ही गर्दी आणि पाऊस आदित्य ठाकरेंकडे खरंच काही संधी घेवून येतेय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण सध्याचं पावसाचं वातावरण तरी आदित्य ठाकरे यांच्यासाठी चिपळूणमध्ये पोषक आहे, असं दिसतंय. कारण भर पावसात शेकडो शिवसैनिकांनी त्यांच्या सभेला गर्दी केली आहे. यामध्ये महिलांचा प्रचंड समावेश आहे.

संबंधित बातम्या

( शिवसेनेची मुलूख मैदान तोफ संजय राऊत यांच्या जामीनाबाबत महत्वाची अपडेट आली बाहेर ) शिवसेनेत दोन महिन्यांपूर्वी मोठी फूट पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जवळपास 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने पक्षात उभी फूट पडली आहे. या सर्व आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकारही कोसळलं आहे आणि भाजप-शिंदे गट यांच्या नेतृत्वातील नवं सरकार निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे गटाने स्वत:च्या पक्षनेतृत्वाला आव्हान दिल्याने आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. ते दोन महिन्यांपासून वारंवार शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका करत आहेत. तसेच त्यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते राज्यभरात दौरा करत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि त्या भागातील शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या