नितीन नांदुरकर, 26 नोव्हेंबर : गुलाबराव पाटील हे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय अत्याचार व दादागिरी करत आहेत. तसेच ते आपल्या पदाचा दुरुपयोग करून गुलाबराव पाटलांनी माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केला आहे. गुलाबराव पाटलांची दादागिरी मोडून काढण्यासाठी 2024 च्या निवडणुकीत धरणगाव मतदार संघातून गुलाबराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचा इशारा शरद कोळी यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे.
यावेळी शरद कोळी म्हणाले की, गुलाबराव पाटील हे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय अत्याचार व दादागिरी करत आहेत. तसेच ते आपल्या पदाचा दुरुपयोग करून गुलाबराव पाटलांनी माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केला आहे.
हे ही वाचा : हे माता कामाख्या देवी.. गुवाहाटी दौऱ्यावरुन रोहित पवारांचा शिंदे गटावर जोरदार निशाणा
गुलाबराव पाटलांची दादागिरी मोडून काढण्यासाठी 2024 च्या निवडणुकीत धरणगाव मतदार संघातून गुलाबराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचा इशारा शरद कोळी यांनी दिला. 2024 च्या निवडणुकीत गुलाबराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवून गुलाबराव पाटलांना एक लाख मतांनी पराभव करून त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचेही शरद कोळी म्हणाले.
गुलाबराव पाटील गुवाहाटीला का नाही गेले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व मंत्री व आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाणार नाहीयेत. जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना देखील उपरोधिक टोला लगावला आहे. पहिल्यांदा जेव्हा आमदार गुवाहाटीला गेले होते तेव्हा संजय राऊत यांनी 50 रेड्यांचा देवीला बळी देणार असं म्हटलं होतं. यावरून टोला लगावताना कामाख्या देवीला 40 रेडे जाणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
**हे ही वाचा :** ‘मी म्हणालो होतो, रश्मीताईंना मुख्यमंत्री करा, किमान त्या..’; सत्तारांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं
जिल्हा दूध संघाची निवडणूक आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. निवडणुकीमुळे मला गुवाहाटीला जाता येणार नाही. मी जरी जाणार नसलो तरी आमचे बाकीचे सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणार आहेत. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.