JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांचा एकाच गाडीतून प्रवास, VIDEO मुळे चर्चांना उधाण

BREAKING : गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांचा एकाच गाडीतून प्रवास, VIDEO मुळे चर्चांना उधाण

बोदवड नगरपंचायत निकालावरून भाजप आणि शिवसेना छुप्या युतीची चांगलीच चर्चा रंगली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इम्तियाज अली, प्रतिनिधी जामनेर, 26 जानेवारी : नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप (bjp), शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीमध्ये (ncp) चांगलाच कलगीतुरा रंगला होता. पण, आता शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mhajan) एकच गाडीमधून प्रवास करत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. बोदवड नगरपंचायत निकालावरून भाजप  आणि शिवसेना छुप्या युतीची चांगलीच चर्चा रंगली होती. शिवसेनेकडून तसा आरोपच करण्यात आला होता. पण, ही चर्चा सुरू असतानाच गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे एकाच गाडीतून प्रवास करत असताना दिसून आले.

एकनाथ खडसेंना बोदवड नगरपंचायतीमध्ये होमपीचवर सेनेने धक्का दिला होता. विशेषत: जामनेरात एक कार्यक्रम आटपून गिरीश महाजन यांच्या घरी पालकमंत्री गुलाबराव पाटील गेले. त्याठिकाणी पालकमंत्र्यांचा सत्कार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. उद्या गिरीश महाजन राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना विचारले पालकमंत्र्यांना याठिकाणी बोलायचं त्यावरून एकच हश्शा पिकली. दरम्यान, गिरीश महाजन यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. “बोदवड नगरपंचायतीच्या निकालाबाबत एकनाथ खडसे यांना काही म्हणू द्या. खडसे विधानसभा निवडणुकीत पडले, आता बोदवड हारले, खरंतर ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते”, असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे. “मंत्रिमंडळात तीन पक्षाचे सरकार आहे. मात्र त्यांच्यात भांडण सुरु आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. तीन पक्षांमध्ये एकमत नाही. त्यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या