JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गुजरात सरकारच्या शपथविधीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण, शिंदे सोहळ्याला जाणार?

गुजरात सरकारच्या शपथविधीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण, शिंदे सोहळ्याला जाणार?

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आलं आहे.

जाहिरात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय झाल्यानंतर आता सत्तास्थापनेला वेग आला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. एनडीएचा मित्रपक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधीचं निमंत्रण मिळालं आहे. मातोश्रीऐवजी आता ठाण्यातून येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शपथविधीला बोलावण्यात आलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाबाबत गुजरात सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे, याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुजरात सरकारकडून खास आमंत्रित करण्यात आलं आहे. राज्यपाल कोश्यारींचा एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका, म्हणाले… भुपेंद्र पटेल राज्यपालांच्या भेटीला दरम्यान गुजरातमध्ये सरकार स्थापन करण्याआधी भुपेंद्र पटेल राज्यपालांना भेटले. राज्यपालांना भेटून भुपेंद्र पटेल यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर भुपेंद्र पटेल राज्यपालांना जाऊन भेटले. सोमवार 12 डिसेंबरला गांधीनगरमध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत. गुजरातमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. 182 पैकी 156 जागांवर भाजपचा विजय झाला. आतापर्यंत कोणत्याच पक्षाला गुजरातमध्ये एवढ्या जागा जिंकता आल्या नव्हत्या. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उघडपणे दिला इशारा, शिंदे गटाचे मंत्री म्हणाले…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या