JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / GST on Food Grains : मोदी सरकार विरोधात राज्यातील शेतकरी व्यापारी रस्त्यावर उतरणार, धान्यावर जीएसटी लावण्याचा निर्णय

GST on Food Grains : मोदी सरकार विरोधात राज्यातील शेतकरी व्यापारी रस्त्यावर उतरणार, धान्यावर जीएसटी लावण्याचा निर्णय

कोरोना आणि बेरोजगारीमुळे सामान्यांची अवस्था बिकट झाली असताना या नव्या नियमामुळे आणखी सामान्यांचे पाय खोलात जाणार आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 16 जुलै : मोदी सरकारकडून धान्यावर जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत धान्यावर जीएसटी लावण्यात आली नव्हती परंतु मोदी सरकारणे हा निर्णय घेतला आहे. 18 जुलैपासून अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा परिणाम व्यापारी आणि थेट ग्राहकांवर होणार आहे. यामुळे आदीच कोरोना आणि बेरोजगारीमुळे सामान्यांची अवस्था बिकट झाली असताना या नव्या नियमामुळे आणखी सामान्यांचे पाय खोलात जाणार आहेत. (GST on Food Grains)

या अंमलबजावणीचे तिव्र पडसाद उमटू लागले आहेत. सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवत नागपूरसह राज्यभरातील मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय राज्य व्यापारी संघटनेने घेतला आहे. शिवाय जीएसटीच्या विरोधात सांकेतिक आंदोलनही होणार असल्याचे व्यापारी संघटनेने सांगण्यात आले. त्यामुळे आज (दि.16) शनिवारी बाजार समिती आणि किरकोळ धान्य विक्रेत्यांकडून धान्य हे खरेदी केले जाणार नाही. याचा फटका शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात का होईना बसणार आहे.

हे ही वाचा :  मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले स्पष्ट उत्तर

संबंधित बातम्या

ज्यावेळी जीएसटी लागू करण्यात आली त्यावेळी अन्नधान्याला सूट देण्यात आली होती. मात्र, कालांतराने सरकारने जीएसटीच्या नियमांत बदल करत अन्नधान्यालाही जीएसटीच्या कक्षात आणले आहे. या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना हे देखील स्पष्ट झालेले नाही. पण व्यापाऱ्यांवरच याचा भार पडणार असल्याने राज्यभरातून विरोध केला जात आहे. सोमवारपासून अन्नधान्यावर 5 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी शनिवारी राज्यातील धान्य मार्केट बंद ठेवण्यात आले आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Onion Rate : भविष्यात कांद्याचा वांदा होऊ नये म्हणून केंद्राची आतापासूनच तयारी काय आहे पूर्ण योजना?

सरकारच्या निर्णयाला विरोध करीत राज्यातील व्यापारी हे एकवटले आहेत. ‘जीएसटी’ अट मागे घ्यावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची देखील अडचण होऊ शकते. त्यामुळे पुर्वीचेच निर्णय कायम ठेऊन यामधून शेतकऱ्यांना आणि २ व्यापाऱ्यांना सूट मिळावी अन्यथा राज्यभर आंदोलन उभारले जाणार आहे. शनिवारी राज्यभर धान्य मार्केट हे बंद राहणार आहे. बाजार समित्यांसह यामध्ये किरकोळ व्यापाऱ्यांचाही सहभाग राहणार आहे.

जाहिरात

केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तूवर 5 टक्के जीएसटी लावल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाच्या विरोधात मनमाडला व्यापारी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी किराणा असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून धरणे आंदोलन करत केंद्र शासनाचा निषेध केला. यावेळी संतप्त व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जीवनावश्यक वस्तूवर लावण्यात आलेला जीएसटी रद्द करण्याची मागणी केली असल्याची माहिती बब्बू शेख यांनी दिली.

जाहिरात

बब्बू शेख,मनमाड

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या