पुणे 13 ऑगस्ट : माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची बहीण मधु प्रकाश पाटील यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास वयाच्या 44 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं असून शनिवारी म्हणजेच आज दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर पद्माळे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. (Dr Madhu Patil Passed Away) राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून पहिल्यांदाच आली महत्त्वाची अपडेट मधु पाटील या राजकीय घराण्यातील होत्या. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात होत्या. तर, त्यांचे आई-वडिलही राजकारणात होते. काँग्रेसचे खासदार स्व. प्रकाशबापू पाटील आणि काँग्रेस नेत्या शैलजा पाटील यांच्या त्या कन्या होत्या. मधु पाटील यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला.
Pankaja Munde: ‘त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…’; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक हृदयविकाराचा धक्का बसताच त्यांना उपचारासाठी पुण्यातीलच एका रुग्णालयामध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं.