सिंधुदुर्ग, 20 डिसेंबर : राज्यात 7751 ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गटात थेट लढत असल्याचे दिसून आले. दरम्यान ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्गमधील वैभववाडी तालुक्यात 17 पैकी 14 ग्रामपंचायतींवर राणे गटाची सत्ता आली आहे. तर 2 ग्रांमपंचायतींवर ग्रामविकास पॅनेलची सत्ता आली आहे.
मागच्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फुट पडल्याने ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन विभाग झाले. याचा फटका आणि ठाकरे गटाला बसत असल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्गमध्ये एकेकाळी शिवसेना ठाकरे गटाची एकहाती सत्ता यायची परंतु मागच्या काही वर्षात शिवसेनेचे सिंधुदुर्गमधील वचर्स्व कमी झाले आहे. वैभववाडी तालुक्यात नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणेंचा वरचष्मा राहिला आहे. यामुळे ठाकरे गटाची आणखी डोकेदुखी वाढली आहे.
हे ही वाचा : चावरेत कोरे-महाडिक गटाला यश; चावरे ग्रामविकास आघाडीपुढे विरोधक भुईसपाट
वैभववाडी तालुक्यात नितेश राणेंचा वरचष्मा राहिला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेला नितेश राणेंनी जोरदार धक्का दिल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. तालुक्यातील एकूण 17 पैकी 14 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा तर 2 ग्रामपंचायत ग्रामविकास पॅनलकडे गेल्या आहेत तर एक ग्रामपंचायत शिंदे गटाकडे गेल्याने वैभवाडीत ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही. कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघात अनेक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.
याचा मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का कोकणात बसल्याची शक्यता आहे. कणकवलीतील भाजपच्या विजयी सरपंच व सदस्यानी भाजप आमदार नितेश रांणेची त्यांच्या निवासस्थानी गर्दी केल्याने मोठा उत्साह वाढला होता. यावेळी नितेश राणेंनी पेढा भरवून सरपंचाचे अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का
हे ही वाचा : बच्चू कडू यांचे बंधू झाले सरपंच, 1234 मतांनी विजयी
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहे. भाजपचे उमेदवार सर्वत्र निवडून आले आहे. पण, मावळमध्ये भाजपसोबत वेगळीच घटना घडली आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रचार केलेल्या गावातच भाजपचा पराभव झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी मावळ तालुक्यात प्रचार केला होता.