गोंदिया, 20 डिसेंबर : महाराष्ट्रात 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालाचा आज धुरळा उडाला. यातील 50 टक्क्यांहून जास्त ग्रामपंचायतींवर भाजप आणि शिंदे गटाने वर्चस्व स्थापन केल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कोकणासह राज्यातील शिवसेनेचा दबदबा असलेल्या भागात ठाकरे गटाचा नामुष्कीजणक पराभव झाला आहे. दरम्यान गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव तालुक्यात बोधरा देवाळा गावची वेगळीच जोरदार चर्चा रंगली आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत बोधरा-देवाळामध्ये एकाच कुटूंबातील सासू आणि सून सरपंच पदाकरिता निवडणूक रिंगणात आमने -सामने होते. आज मतमोजणी सुरू झाली निकाल हाती आला असून सुनेने सासूचा पराभव केल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. हे दोन्ही उमेदवार अपक्ष म्हणून उभे होते. आज सून सरपंच पदावर निवडून आल्याने गावामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला.
हे ही वाचा : ‘हे बरोबर नाही’, सभापतींनी कामकाज तहकूब करताच देवेंद्र फडणवीस संतापले
भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष
राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी सुरू आहे. जवळपास बऱ्याच जिल्ह्यातील निकाल हे स्पष्ट झाले आहे. 7751 पैकी 4935 जागांचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निकालामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी हा दुसरा स्थानावर आहे. तर शिंदे गटाने तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस तिसऱ्या तर शिवसेना ही पाचव्या स्थानावर आहे.
राज्यात शिंदे आणि भाजप सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरं जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीनेही कडवी टक्कर देत आहे. 34 जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.
हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांनी जिथे केला प्रचार तिथे भाजप उमेदवार पडला!
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाने मोठी आघाडी घेतली आहे. जवळपास 2089 जागांवर आघाडीवर आहेत महाविकास आघाडी 2006 जागांवर आघाडीवर आहे. अवघ्या काही जागांसाठी कांटे की टक्कर सुरू आहे.