जालना, 29 जून: अवकाळी पावसामुळे झालेलं शेतीचं नुकसान, कोरोनाचं संकट यातून बळीराजा आता कुठे सावरत आहे. मात्र, त्याच दरम्यान चोरट्यांच्या उच्छादामुळे शेतकऱ्यावर नव संकट आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जनावरांची चोरी (Animal theft) होण्याच्या घटना घडत आहेत. या चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. चोरट्यांनी केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद (goat theft caught in CCTV) झाली आहे. जालना जिल्हाचा (Jalna District) सीमावर्ती भाग असलेल्या बदनापूर (Badnapur) आणि भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील परिसरात बैल, बकऱ्या अशा मुक्या जनावरे चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विक्रम वानर्से या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यातून देखील 20 हजार रुपये किमतीची एक बकरी चोरट्यांनी चोरून नेली.
महाराष्ट्रातील तरुणाला धर्मांतर प्रकरणात यूपीत अटक; कोण आहे इरफान, काय आहे बीड कनेक्शन आणि कोडवर्ड? शेतकऱ्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी एका दुचाकीवरून ही बकरी चोरून पोबारा केला. दरम्यान, दुचाकीवरून बकरी चोरून घेऊन जाताना अचानक गाडीतील पेट्रोल संपले. पेट्रोल भरण्यासाठी गेले असता बकरीचोर पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरट्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये बकरीचोर आणि दुचाकीचा नंबर स्पष्टपणे दिसत आहे. सीसीटीव्हीमध्ये बकरी चोर आणि त्यांच्या गाडीचा क्रमांक देखील दिसत आहे पण असे असतानाही पोलीस बकरीचोरांना अद्याप पकडू शकले नसल्याने पीडित शेतकरी हवालदिल झाला आहे.