JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गिरीश महाजन म्हणतात 'आम्ही खूप प्रयत्न केले, पण शेवटी रामदास आठवलेंमुळेच भाजप सत्तेत आलं'

गिरीश महाजन म्हणतात 'आम्ही खूप प्रयत्न केले, पण शेवटी रामदास आठवलेंमुळेच भाजप सत्तेत आलं'

रामदास आठवले यांना सोबत घेताच आमची सत्ता आली त्यामुळे रामदास आठवले यांना आम्ही सोडणार नसून ते कायमचे आमच्यासोबत असल्याचंही यावेळी गिरीश महाजन म्हणाले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव 04 ऑक्टोबर : भुसावळ येथे आरपीआय आठवले गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, की रामदास आठवले जिकडे जातात त्यांची सत्ता येते. आम्ही प्रयत्न केले मात्र जमत नव्हतं, रामदास आठवले यांना सोबत घेताच आमची सत्ता आली, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोलेंची भंडाऱ्यात गुप्त भेट, राजकीय चर्चांना उधाण रामदास आठवले यांना सोबत घेताच आमची सत्ता आली त्यामुळे रामदास आठवले यांना आम्ही सोडणार नसून ते कायमचे आमच्यासोबत असल्याचंही यावेळी गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान रामदास आठवले यांनीही यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ज्यांचं फिरलं आहे डोके, ते म्हणताहेत 50 खोके एकदम ओके, असं म्हणत आठवलेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला. शिंदे गटातील आमदार हे गद्दार नाहीत, ते गद्दार असते तर त्यांच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनता नसती असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले आहेत. केवळ आमदार, खासदार शिंदे यांच्यासोबत नाहीत तर संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी असल्याचं शिंदे यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झालेल्या सभांवरुन लक्षात येतं, असंही आठवले म्हणाले. धनुष्यबाण कुणाला? निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिली डेडलाईन उद्धव ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा तो निर्णय चुकला असे म्हणत दसरा मेळावा होत आहे. यात शिंदे आणि ठाकरे असा सामना चांगलाच रंगणार आहे. उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर चोख उत्तर एकनाथ शिंदे देतील. गद्दारी ही एकनाथ शिंदे नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी केली. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला, असंही रामदास आठवले म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या