मुंबई 30 ऑगस्ट : आपल्याला तर हे माहित आहे की, लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी 1893 साली संपुर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरूवात केली. यावेळेस पुणे, मुंबई या शहरात काही तरुणांनी एकत्र येत या सार्वजनिक गणेशोत्सवास सुरूवात केली होती. मग अशा वेळी असा प्रश्न पडणं सहाजिकच आहे की, हा सार्वजनिक मंडळ नक्की आहे तरी कुठे आणि त्याचं नाव काय आहे? केशवजी नाईक चाळीतून याची सुरूवात केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळकांचे काही अनुयायी राहत असत अशी माहिती समोर आली आहे. रावबहाद्दुर लिमये आणि नरहरि गोडसे हे या चाळीतील लोकमान्यांचे अनुयायी होत. त्यामुळे लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या या संकल्पनेला त्यांनी प्रतिसाद देत या चाळीत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. या लोकांनी पुढाकार घेऊन या उत्सवाचे नियोजन केले. सार्वजनिक गणेशमुर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांनी ब्रिटशांविरोधातील धार तीव्र करण्यासाठी भारतीयांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. भारतीयांच्या एकत्रिकरणामुळे विचारांची देवाणघेवाण तर होतेच परंतु एकीचे बळही वाढते. टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्याच वर्षी मुंबईतही गिरगावात केशवजी नाईक या चाळीत सार्वजनिक गणेशमुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. हे वाचा : Gauri Ganpati Muhurt 2022 : गणपती प्रतिष्ठापना, ज्येष्ठा गौरी आवाहन आणि विसर्जन, ‘हे’ आहेत अचूक शुभ मुहूर्त सुरूवातीपासून पर्यावरणपुरक गणेशोत्सव ही चाळ खाडीलकर मार्ग चर्नी रोड येथे आहे. या चाळीत साजरा होणारा गणेशोत्सव सुरूवातीपासून पर्यावरणपुरक होता. त्यामुळे गणपती सार्वजनिक असला तरी श्रींची मुर्ती ही लहान आकाराचीच होते. आजपर्यंत या मंडळाने या उत्सवाच मांगल्य जपलं आहे. यंदा या मंडळाचं 128 वं वर्ष आहे. 1992 मध्ये या मंडळाने आपले शताब्दी वर्ष साजरे केले होते. मुर्ती ही साधारण 2 फुट केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सवाती मुर्ती ही साधारण 2 फुट एवढी असते. ती पर्यावरन पूरक असल्यामुळे सहाजिकच शाडूच्या मातीपासून बनलेली असते. सोबतच मंडळ नेहमी पर्यावरणाशी अनुकूल असलेलं पुजा साहित्य वापरत असतं. हे वाचा : केवळ अष्टविनायकच नाही तर भारतातील ही गणपती मंदिरंही खूप प्रसिद्ध, पाहा फोटो विशेष बाब म्हणजे ज्या कुटूंबाने या मंडळाची श्रींची मुर्ती पहिल्यांदा घडवली होती. त्याच कुटूंबाची चौथी पिढी सध्या दरवर्षी ही मुर्ती बनवत आहे. जेथे मुंबईतील गणेशोत्सव आता एक मोठा इव्हेंट होत चालला आहे, त्याच युगात आजही या मंडळाने आपले मांगल्यपूर्ण उत्सवाचे स्वरूप जपले आहे.