JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मराठा आरक्षणासाठी राज्यातील पहिला जिल्हा आज बंद, टायर पेटवून आंदोलनाला सुरुवात

मराठा आरक्षणासाठी राज्यातील पहिला जिल्हा आज बंद, टायर पेटवून आंदोलनाला सुरुवात

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला, जागोजागी तीव्र आंदोलनाची हाक

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 21 सप्टेंबर : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज नाराज झाला आहे. आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. आज सोलापुरात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातली आंदोलनाची पहिली ठिणगी माढ्यात पडली आहे. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. मोठी बातमी! भिवंडीत इमारत कोसळून 8 जणांचा मृत्यू 100 लोक अडकल्याची भीती आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, माढ्यातील तरुणांनी भल्या पहाटेच एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी माढा शहर दणाणून सोडलं आहे. त्यामुळे जिल्हाभरात आज दिवसभरात कशा पध्दतीने हे आंदोलन पार पडतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाज आंदोलन करणार आहे. कोल्हापुरातही आज पुन्हा मराठा समाजाचे आंदोलन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘सरकारने मंजूर केलेला कायदा शेतकऱ्यांना कंपन्यांच्या दावणीला बांधणारा’ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे आंदोलन करत राज्य सरकारचे प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज बारावा दिवस आहे. सकल मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून आंदोलन न करण्याबाबत पोलीसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. पण तरीदेखील आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम आहेत. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या