JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आधी 2 आमदार आता खासदारही शिंदे गटात, बुलडाण्यात शिवसेनेला धक्के पे धक्का!

आधी 2 आमदार आता खासदारही शिंदे गटात, बुलडाण्यात शिवसेनेला धक्के पे धक्का!

बुलडाणा जिल्ह्यातील 2 आमदारांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार प्रतापराव जाधव (prataprao jadhav) हे सुद्धा शिंदे गटाच्या उंबरठ्यावर

जाहिरात

बुलडाणा जिल्ह्यातील 2 आमदारांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार प्रतापराव जाधव (prataprao jadhav) हे सुद्धा शिंदे गटाच्या उंबरठ्यावर

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलडाणा, 19 जुलै : शिवसेनेमध्ये आमदारांना फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता खासदार सुद्धा शिंदेंच्या गळाला लागले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 2 आमदारांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार प्रतापराव जाधव (prataprao jadhav) हे सुद्धा शिंदे गटाच्या उंबरठ्यावर आहे. सोमवारी झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीला जाधव हजर होते. राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईत गेलेल्या शिंदे गटांच्या ४० आमदारांची मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत दिल्लीहून सेनेचे 12 खासदार ऑनलाईन उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यात बुलडाण्याचे सेना खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात 11 खासदार होते. पण, दोन तृतीयांश आकडा गाठण्यासाठी एका खासदाराची गरज होती. त्यानंतर कोल्हापूरचे दोन्ही शिवसेनेचे खासदार शिंदे गटात यायला तयार झाले. त्यानंतर आयोजित बैठकीला 12 खासदार हजर होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. रात्री 12 वाजता शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाले. दिल्लीत जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडकोर खासदारांनी राजधानीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण सोबत केलं. दिल्लीत दाखल होताच एकनाथ शिंदे आधीच दिल्लीतील (Eknath Shinde in Delhi) एका हॉटेलमध्ये थांबलेल्या खासदारांना भेटण्यासाठी गेले. ( एकनाथ खडसे गटाला मोठा धक्का, जळगावातून मोठी बातमी ) रात्रीच्या जेवणासाठी मुख्यमंत्र्यांसोबत कृपाल तूमाने, हेमंत गोडसे, धैर्यशील माने,राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे सदाशिव लोखंडे,भावना गवळी, संजय मंडलिक,श्रीकांत शिंदे यांच्यासह बारा खासदार उपस्थित होते. 12 खासदार उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, सध्या दिल्लीत थांबलेल्या खासदरांना घेऊन एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. ( धक्कादायक! नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहणाऱ्या युवकाला चाकूने 6 वेळा भोसकलं ) यासोबतच बंडखोर खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. यावेळी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात येणार आहे. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद पदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र ते देणार आहेत. सोबतच आज दुपारी महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री आणि सर्व खासदार पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या