JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...अन् दिपावलीच्या तोंडावरच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं; बीडमधील हृदय पिळवटणारी घटना

...अन् दिपावलीच्या तोंडावरच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं; बीडमधील हृदय पिळवटणारी घटना

बीड जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या (Farmer suicide) केली आहे. ऐन दिपावली सणाच्या तोंडावर आत्महत्या केल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जाहिरात

संदिपान रामा चव्हाण असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचं नाव आहे. (फोटो- दिव्य मराठी)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 30 ऑक्टोबर: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. ढगफुटी सदृश्य कोसळलेल्या पावसात अनेक शेतकऱ्यांची शेती पिकांसह वाहून गेली आहे. दरम्यानच्या काळात हवालदिल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचं (Farmer suicides in marathwada) हे सत्र अद्याप सुरूच आहे. यानंतर आता बीड जिल्ह्यातील एका अल्पभूधारक  शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या (Farmer suicide) केली आहे. ऐन दिपावली सणाच्या तोंडावर आत्महत्या केल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संदिपान रामा चव्हाण असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांच्या वडिलांच्या नावावर दीड एकर शेती होती. पण एवढ्या शेतीवर संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न त्यांना सतावत होता. अशात अस्मानी संकाटामुळे अनेकदा हातातोंडाला आलेला घास हिरावला होता. त्यामुळे ते ऊसतोडणी कामगार म्हणून देखील काम करत होते. मृत चव्हाण यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. यातील एका मुलीचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला होता. हेही वाचा- जेवणात एकच चपाती दिल्याने चिमुकल्यांचा घेतला घास; भावाच्या कृत्याने जळगाव हादरलं पण दुसऱ्या मुलीचा विवाह कसा करायचा? याची चिंता त्यांना सतावत होती. यातूनच गेल्या काही दिवसांपासून त्यांना नैराश्य आलं होतं. दरम्यान गुरुवारी रात्री चव्हाण यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत शेवटचं जेवण केलं आणि ते घराबाहेर पडले. यानंतर त्यांनी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा- विवाहितेच्या कौटुंबीक वादातून साधला डाव; ससूनमधील तोतया डॉक्टरकडून तरुणीवर रेप या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृत चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या