'कोणतेही कारण नसताना आरोप केले जात आहे. दबावतंत्राचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई, 29 ऑक्टोबर : SRA घोटाळा प्रकरणामध्ये कोर्टाने स्पष्टपणे लिहून दिलं आहे की माझा त्यात समावेश नाही. यामध्ये ते स्वत: किशोरी पेडणेकर यांचा एसआरएने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मी तुमच्या दबावाला बळी पडणार नाही, मी बोलणारच, असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला इशारा दिला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर तिसरी पेडणेकर आक्रमक होऊन गोमाता नगर येथील गाळ्यांची पाहणी करायला गेल्या होत्या. यावेळी गाळा धारकांशी बातचीत केली. हा गाळा माझा असेल तर मी त्याला आताच टाळा लावते. अशा पद्धतीने किशोरी पेडणेकर आक्रमक झाल्या होत्या.
‘दरवेळा किरीट सोमय्या हे लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. सोमय्या खोटे आरोप करत आहे. कोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. कोर्टाने स्पष्टपणे लिहून दिलं आहे की माझा त्यात समावेश नाही. यामध्ये ते स्वत: किशोरी पेडणेकर यांचा एसआरएने स्पष्ट केलं आहे’ असं किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितलं. ‘कोणतेही कारण नसताना आरोप केले जात आहे. दबावतंत्राचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचं म्हणण आहे की किशोरी पेडणेकर भाऊ म्हणाले. पण आपल्याकडे संस्कृती आहे. नवरा सोडून वडिलांना सुद्धा भावाच्या नजरेत पाहतो. वारंवार वार केले जात आहे. जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. ज्यांना जेरीस आणलं त्यांना त्याला भाजपमध्ये घेऊन जाऊन वाशिंग मशीनमध्ये धुवून काढले जात आहे. हा बेगडीपणा आहे, अशी टीकाच पेडणेकर यांनी केली. (SRA घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, किरीट सोमय्यांनी केला नवा दावा) मीडियाच्या माध्यमातून शब्द पकडून आरोप केले जात आहे. राळ उठवला जात आहे. एक तर तोंड बंद कर नाहीतर बोलायचं नाही. असा त्यांचा डाव आहे, त्याला मी बळी पडणार नाही, माझं तोंड बंद करणार नाही, असंही किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितलं. गोमातानगरमध्ये मी २०१७ ला अर्ज भरला होता कारण नसताना राळ उठवले आहे. गोमातमध्ये काही दुकानं आणि बालवाड्या सोसायटीच्या ताब्यात आहेत. एक जरी गाळेधारक बोलला की गाळा किशोरी पेडणेकर यांचा आहे असं बोलले तर कुलुप लावा, एका सामान्य महिलेला तुमचा एक माणूस त्रास देतोय. इथं भाड्याने राहणे गुन्हा होता का? जर असं काही असेल तर ७ दिवसात टाळे लावा, असंही पेडणेकर यांनी टाळे दाखवत स्पष्टच बोलून दाखवलं. (25 पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो, भाजप आक्रमक, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल) दादरच्या पोलीस स्टेशनला बोलवलं जातंय यामुळे विचार करा किती दबाव आहे. मला पोलिसांनी बोलवलं नाही, जर बोलवलं तर जाईन. हिशोब तर द्यावच लागेल. आज टार्गेट केलं जातंय तथ्य नसताना तथ्यहीन बोललं जात आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, असंही किशोर पेडणेकर म्हणाल्या.