JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई, केडीएमसी पालिका निवडणुकीच्या तोंडावर स्फोटकांचा मोठा साठा जप्त, तब्बल 1 हजार जिलेटीन सापडले

मुंबई, केडीएमसी पालिका निवडणुकीच्या तोंडावर स्फोटकांचा मोठा साठा जप्त, तब्बल 1 हजार जिलेटीन सापडले

तब्बल 1 हजार जिलेटीन (Gelatin ) आणि डिटोनेटर (detonator) जप्त करण्यात आले आहे.

जाहिरात

तब्बल 1 हजार जिलेटीन (Gelatin ) आणि डिटोनेटर (detonator) जप्त करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भिवंडी, 01 फेब्रुवारी : मुंबईसह (bmc election), ठाणे आणि  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांचा ( KDMC municipal election) कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. पण, त्याआधीच भिवंडीमध्ये (bhiwandi) मोठ्या प्रमाणात स्फोटकांनी भरलेली सामुग्री जप्त करण्यात आली आहे. तब्बल 1 हजार जिलेटीन (Gelatin ) आणि डिटोनेटर (detonator) जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीनाका इथं ही कारवाई करण्यात आली आहे.   अल्पेश पाटील, पंकज चव्हाण, समीर वेडगा अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहे. ( आता कोरोना टेस्टमुळे होणारा त्रास विसरा; तुमच्या स्मार्टफोनद्वारे होईल टेस्ट ) पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून 1 हजार जिलेटीन नग, 1 हजार डीटोनेटर नग आणि इको कार जप्त केली आहे. स्फोट घडवून आणण्याची सुमारे साडेचार लाख रुपयांचे स्फोटक सामुग्री जप्त केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ( जुगार अड्ड्यात झाला वाद, टोळक्याने कोयत्याने केले दोघांवर सपासप वार ) विशेष म्हणजे, मुंबई महापालिका, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानेही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं कुणी आणली, या मागे कुणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या